पंढरपूर (प्रतिनिधी) - यावर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्याच्या विविध भागामध्ये दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध महसूली मंडळांना दुष्काळी तालुक्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
नव्याने यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या महसुली मंडळांचा दुष्काळजन्य तालुके म्हणून घोषित होण्यासाठी आमदार आवताडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील व मदत आणि पुनवर्सन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार व प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू ठेवला होता. नैसर्गिक वक्रदृष्टीने दुष्काळी तालुका अशी परंपरागत ओळख असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यामध्ये या दुष्काळाची खूप मोठी दाहकता निर्माण झाली होती. परंतु आमदार आवताडे यांनी या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन दरबारी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री तसेच पालकमंत्री यांची मुंबई येथे भेट घेऊन या मागणीवर शासनाने संवेदनशील मार्गाने विचार करुन या महसुली मंडळांचा दुष्काळी यादीमध्ये समाविष्ट करावा अशी मागणी केली होती. तसेच याच आठवड्यामध्ये आ. आवताडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मदत व पुनर्वसन आणि पालकमंत्री महोदय यांना दूरध्वनी द्वारे संपर्क करून या महसुली मंडळांच्या समाविष्टसाठी जिल्हाधिकारी यांना आदेशित करण्याची मागणी आमदार आवताडे यांनी केली होती.
या दुष्काळी यादीमध्ये पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील समाविष्ट महसूली मंडळांची नावे पुढीलप्रमाणे - पंढरपूर, भंडीशेगांव, भाळवणी, करकंब, पाटकुली, पुळूज, चळे, तुंगत, कासेगाव तर मंगळवेढा तालुक्यातील महसूल मंडळे पुढीलप्रमाणे- बोराळे,मरवडे, आंधळगाव, मारापुर, मंगळवेढा, भोसे, हुलजंती. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील खर्डी व मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ याही महसूली मंडळाचा सुद्धा लवकरात लवकर या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्यामुळे या मंडळातील शेतकऱ्यांना चिंता करु नये असे आमदार आवताडे यांनी सांगितले आहे.
आ आवताडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे दुष्काळी यादीमध्ये समाविष्ट झालेल्या महसूली मंडळामुळे दुष्काळी खाईत लोटलेल्या बळीराजाला शेती व आपले पशुधन जगवण्यासाठी शासनामार्फत मोठा आधार निर्माण झाला आहे. शेतीच्या उत्पादनाद्वारे दरोडाई उत्पन्नाची संकल्पना मांडणाऱ्या या दोन्ही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी खूप मोठ्या चिंतेत होता. परंतु आ आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या वास्तविक परिस्थितीची जाणीव ठेवून हा समावेश घडवून आणल्याने शेतकरी सुखावला आहे.