सोमवारपासून होणार आनंदाचा शिधा वाटप

0
95 गावांतील 146 रेशन धान्य दुकाने सज्ज;  40 हजार 696 कुटुंबांना मिळणार आनंदाचा शिधा

          पंढरपूर (प्रतिनिधी) -  पंढरपूर तालुक्यातील 95 गावांमध्ये एकूण 146 रेशन धान्य दुकाने आहेत. त्यामध्ये 40 हजार 696 कुटुंबांना आनंदाचा शिधा सोमवार दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी पासून प्रत्यक्ष वितरण होणार आहे. 'आनंदाचा शिधा' यामध्ये एक लिटर तेल, एक किलो साखर, डाळ, मैदा, पोहे, रवा या चार वस्तू अर्धा किलो व पिशवी अशा  वस्तू आहेत. त्या शासकीय धान्य गोदाम पंढरपूरमध्ये प्राप्त झाले आहे. शासकीय धान्य गोदामामधून रेशन धान्य दुकानांना वितरण चालू असल्याची माहिती तहसिलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
          गतवर्षी ‘आनंदाचा शिधा’ या संचात रवा, चनाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र आता यामध्ये दोन जिन्नसांची म्हणजेच मैदा आणि पोहा यांची भर पडली आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेद्वारे शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त एक लिटर तेल, एक किलो साखर, डाळ, मैदा, पोहे, रवा या चार वस्तू अर्धा किलो व पिशवी अशा  वस्तू शिधा  जिन्नस समाविष्ट  असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा प्रतिसंच 100 रुपये दरात ई- पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. हा  शिधा तालुक्यातील 40 हजार 696 इतक्या पात्र कार्डधारकांना सवलतीच्या दरात दिपावलीसणा अगोदर म्हणजेच सोमवार दि. 6 रोजी पासून वाटप केला जाणार असल्याचे तहसिलदार बेल्हेकर यांनी सांगितले.

          पंढरपूर  तालुक्यातील 146 रास्त भाव धान्य दुकानदारांकडून मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. रास्त भाव धान्य दुकानदारांकडून पात्र शिधापत्रिकाधारकांना योग्य पध्दतीने ’आनंदाचा शिधा ’ वाटप करण्यात येणार आहे. याबबात पुरवठा निरिक्षक सदानंद नाईक व कर्मचार्‍यांनी नियोजन केले असल्याची माहिती नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)