पंढरपूर (प्रतिनिधी) - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सन २०२३-२४ या वर्षातील विविध विकास कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील व पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे. सदर निधीतून मतदारसंघाच्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांच्या दलित वस्तीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी व्यायामशाळा बांधणे, अभ्यासिका उभारणे, समाज मंदिर बांधणे व दुरुस्ती करणे, संविधान भवन बांधणे, दलित वस्ती अंतर्गत रस्ते सुधारणा व कॉंक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश असल्याची माहिती आ. आवताडे यांनी दिली आहे.
पंढरपूर तालुक्यातील निधी मंजूर गावांची नावे व निधी -
उंबरगाव येथील दलित वस्ती नंदू आहेरकर घर ते चिंतामणी गायकवाड वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तावशी येथे दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे १० लाख, गोपाळपूर येथे दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे १० लाख, मुंढेवाडी येथे दलित वस्तीसाठी समाज मंदिर बांधणे १० लाख, रांझणी येथे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये वाचनालय बांधणे १० लाख, ल. टाकळी येथील जिल्हा परिषद शाळा ते महालक्ष्मी मंदिर दलित वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लाख, सिद्धेवाडी येथील दलित वस्ती मध्ये अभ्यासिका बांधणे ७ लाख व सज्जन मस्के घर सारंग भोपळे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, तसेच तरटगाव ते गोरख क्षीरसागर घर (दलित वस्ती) पोहोच रस्ता करणे ३ लाख, कासेगाव येथील निळा झेंडा चौक ते अण्णाभाऊ साठे नगर रस्ता सुधारणा करणे १० लाख, कुरे वस्ती शाळा ते आप्पा वाघमारे वस्ती दलित वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, अण्णाभाऊ साठे नगर दलित वस्तीमध्ये वाचनालय बांधणे १० लाख, गादेगाव येथे मातंग समाज दलित वस्ती मध्ये पाण्याची टाकी बांधणे ५ लाख, दलित वस्ती मधील गावठाण नं.१ शेजारील रस्ता सुधारणा करणे ५ लाख, बोहाळी येथील दलित वस्तीमध्ये महार नोर खोरा येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, दलित वस्तीमध्ये चंदनशिवे रणदिवे वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, शेटफळ येथील दलित वस्ती शेटफळ-कासेगाव ते शेटफळ-खर्डी रस्ता सुधारणा करणे १० लाख, कौठाळी दलित वस्ती संत रोहिदास नगर गावठाण काँक्रिटीकरण करणे ५ लाख, शिवाजी चव्हाण वस्ती ते अण्णाभाऊ साठे नगर मस्के वस्ती पोहोच रस्ता करणे १० लाख, शिरढोण येथील पुनर्वसन गावठाण दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख, दलित वस्ती मध्ये सार्वजनिक शौचालय बांधणे १० लाख, वाखरी येथील प्रभू कृष्णा घोडके दलित वस्ती पोहोच रस्ता करणे १० लाख, एकलासपूर येथील दलित स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १०, तनाळी येथील दलित वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, अनवली येथील दलित वस्ती अंतर्गत मरीआई मंदिर व खंडोबा मंदिर शेजारी पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, गवळी वस्ती (दलित वस्ती) अंतर्गत पोहोच रस्ता करणे
मंगळवेढा तालुक्यातील निधी मंजूर गावांची नावे व निधी - ब्रह्मपुरी येथील दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, लोणार येथे समाजमंदिर बांधणे ७ लाख, हुन्नूर येथे दलित वस्ती मध्ये अभ्यासिका बांधणे ७ लाख, मरवडे येथील इंदिरानगर मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोटार, बोअर, हौद करणे ५ लाख, मरवडे येथील आंबेडकर मैदान सुशोभीकरण करणे ५ लाख, पौट येथील दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, आसबेवाडी येथील दलित वस्ती मध्ये अभ्यासिका बांधणे ७ लाख, रड्डे येथील भीम नगर मध्ये बौद्धविहार बांधणे १० लाख, शिरनांदगी येथील चौगुले- जावीर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लाख, चिक्कलगी येथील माळवाडी येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे ७ लाख, खोमनाळ येथे मागासवर्गीय स्मशानभूमी मध्ये शेड बांधणे ५ लाख, सलगर बु येथील मायाक्का मंदिर ते दलित वस्ती मधील भोरकडे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, आंधळगाव येथील दलित वस्ती मध्ये जिल्हा परिषद शाळा ते काळंबादेवी मंदिरापर्यंत गटार बांधणे १० लाख, बठाण येथील मागासवर्गीय स्मशानभूमी पर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, सोड्डी येथील मागासवर्गीय स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, रहाटेवाडी येथील दलित वस्ती मधील मरिआई मंदिर ते जिल्हा परिषद शाळा जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे ७ लाख, चोखामेळा नगर येथील दलित वस्ती अंतर्गत आवताडे क्रशर ते महात्मा गांधी मागासवर्गीय कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेपर्यंत जाणारा रस्ता सुधारणा करणे ७ लाख, माचणूर येथे दलित वस्ती मध्ये जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १५ लाख, लक्ष्मी दहिवडी येथील दलित वस्ती मधील रोहिदास गल्ली ते ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, अरळी येथे दलित वस्ती येथील सावंत वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे १० लाख, तळसंगी येथील मागासवर्गीय वस्तीत गट नं १७१ मध्ये अभ्यासिका बांधणे १० लाख, घरनिकी येथे दलित वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे ५ लाख, मारापुर येथे दलित वस्तीमध्ये समाज मंदिर बांधणे १० लाख, हुलजंती येथे दलित वस्ती मध्ये संत रोहिदास मंदिरासमोर समाज मंदिर बांधणे १५ लाख, डोंगरगाव ते दलित वस्तीतील खडतरे वस्ती रस्ता सुधारणा करणे १० लाख, जालिहाळ येथील दलित वस्ती अंतर्गत जावीर वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे ५ लाख, भोसे- शिरनांदगी रस्त्यावरून दलित वस्ती अंतर्गत निवृत्ती खडतरे वस्तीपर्यंत रस्ता सुधारणा करणे १० लाख, पाठकळ ते डोंगरगाव रस्त्यावरून दलित वस्ती अंतर्गत पांडुरंग खडतरे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख, नंदेश्वर येथील भीमनगर मध्ये आंबेडकर भवन बांधणे १५ लाख, डोंगरगाव ते दलित वस्ती अंतर्गत सोपान खडतरे वस्ती कडे जाणारा रस्ता सुधारणा करणे १० लाख, गुंजेगाव येथील दलित वस्ती अंतर्गत प्रमोद ढोबळे घर ते राजू शिरतोडे घर रस्ता सुधारणा करणे ५ लाख, भोसे येथील दलित वस्तीतील बुद्ध विहार दुरुस्ती व सुशोभीकरण करणे ७ लाख, सलगर खु.दलित वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लाख, हिवरगाव गावठाण ते इंदिरानगर दलित वस्तीमध्ये पथदिवे बसविणे व दलित वस्ती अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसविणे १० लाख, नंदेश्वर शिरसी रस्ता ते दलित वस्ती अंतर्गत बापू खडतरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ५ लाख, जित्ती येथील दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे ५ लाख.
--------------------------------------------------
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या शिक्षण, आरोग्य, रस्ते पाणी या सुविधा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी या महत्त्वकांक्षी योजनेमार्फत हा भरीव निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेल्या सदर निधीमुळे मतदार संघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व धोरणात्मक विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.
विकासापासून वंचित असणाऱ्या दलित घटकांच्या विकासासाठी आ. समाधान आवताडे यांनी एवढा मोठा निधी उपलब्ध करून दलितांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठी चालना दिली आहे. दलितवस्तीसाठी मंजूर झालेल्या या निधीतून अनेक कामे मार्गी लागणार असून याचा फार मोठा फायदा दलित समाजाला होणार आहे.मतदारसंघातील दलित घटकांच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमतःच निधी मंजूर झाल्याने संपूर्ण दलित समाज आ. आवताडे यांच्या कार्यपद्धतीवर जाम खुश झाला आहे.
- भारत रणदिवे
(माजी सरपंच, तावशी)
--------------------------------------------------