स्वेरीत ‘स्वेरी, सर्व अँड स्मॅश’ बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

0
         पंढरपूर (प्रतिनिधी) - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये दि.०७ नोव्हेंबर व दि.०८ नोव्हेंबर २०२३ रोजी  ‘स्वेरी, सर्व अँड स्मॅश’ या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
            स्वेरीच्या स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये एकूण ९१ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून खेळाडूंची चपळता, त्यांचा वेग, खेळासाठीचा उत्साह, धोरणात्मक खेळ आणि  खिलाडीवृत्ती अशी  विविध कौशल्ये दिसून आली. पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिव्हील इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील सानुष सुरेंद्र भाटकर यांनी आदित्य आनंद घवटे यांना अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत केले. महिला एकेरी स्पर्धेत कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या निकिता बाजीराव मिसाळ यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील दिशा फुलचंद भट्टड यांचा पराभव करून अशक्यप्राय असा  विजय मिळवला. प्रत्येक गटातील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे प्रणव पाटील यांना  ‘सर्वोत्कृष्ट क्रीडापटू’ म्हणून तर सिव्हील इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे दीपक संभाजी शिंदे यांना 'रायझिंग स्टार’ खेळाडू म्हणून विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
          स्पर्धकांनी उल्लेखनीय खेळ करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या यशस्वी खेळाडूंना स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मार्गदर्शक प्रा. संजय मोरे व क्रीडा प्रशिक्षक दीपक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार,  स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)