जिल्हा न्यायाधीश श्री. एम. बी. लंबे यांचा अनोखा उपक्रम !

0

कार्तिकी वारीचे औचित्य साधुन कायदेविषयक भित्तीपत्रकामार्फत कायद्याची जनजागृती

पंढरपूर (प्रतिनिधी) - दिनांक २३/११/२०२३ रोजी कार्तिकी वारी असल्याने पंढरपूर शहरामध्ये व सभोवतालच्या परिसरामध्ये हजारो संख्याने भाविक, वारकरी पंढरपूर शहरामध्ये दाखल होत असल्यामुळे मा. श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा सभोवताली कायदेविषयक भित्तीपत्रके देवुन कायद्यांची माहिती होणेसाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. 
         पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरा सभोवताली हजारो भाविक येत असतात, त्या भाविकांसाठी कायद्यांची जनजागृती व कायद्याचा प्रसार सर्वत्र झाला पाहिजे व जास्तीत जास्त तळागाळातील नागरिकांना विधी सेवा समितीमार्फत देण्यात येणाऱ्या सुविधींचा लाभ भेटला पाहिजे या हेतुने ही मोहिम दिनांक २२/११/२०२३ ते दिनांक २४/११/२०२३ या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये राबवली जात आहे. 

        दिनांक २२/११/२०२३ रोजी पंढरपूर शहरातील चौफाळा, पश्चिमव्दार व नामदेव पायरी या ठिकाणी कायदेविषयक भित्तीपत्रकांचे वाटप करुन विधीसेवा समितीमार्फत असणाऱ्या सुविधींचा लाभ कशाप्रकारे घेता येईल याबाबत विधीस्वयंसेवक यांच्यामार्फत सांगण्यात आले.

         या मोहिमेस तालुका विधी सेवा समितीवर कार्यरत असणारे विधीस्वयंसेवक श्री. पांडुरंग अल्लापूकर, श्री. शंकर ऐतवाडकर, श्री. नंदकुमार देशपांडे, श्री. महेश भोसले, श्री. सुनिल यारगट्टीकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)