कार्तिकी यात्रेनिमित्त श्रीविठ्ठल रूक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू

0
मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय 

          पंढरपूर (प्रतिनिधी) -  श्रीक्षेत्र पंढरी नगरीत कार्तिकी एकादशी (प्रबोधिनी एकादशी) गुरूवार, दि. २३ नोव्हेंबर,२०२३ रोजी साजरी होत आहे. दरवर्षी यात्रेला विठ्ठल भक्त, वारकरी मंडळी, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला मुहुर्त व दिवस पाहून श्रींचा
पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. तसेच दररोजच्या नित्य उपचार कालावधी  वगळता सर्वांना पददर्शन घेतला येईल असे मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
          गुरुवार दि. १६ नोव्हेबंर २०२३ रोजी श्रींचापलंग परंपरेनुसारकाढण्यात
आला असून श्रीविठ्ठलास लोड व श्रीरूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला आहे. त्यामुळे काकडा
आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार बंद होवून खालील राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत
म्हणजे दि.०१/१२/२०२३  पासून सुरू होतील याची सर्व भाविकभक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

           दि. १६/११/२०२३ ते १/१२/२०२३ या कालावधीत खालील नित्योपचाराच्या वेळा वगळता २२.१५
तास पदस्पर्श दर्शन व २४ तास मुखदर्शन उपलब्ध असणार आहे.

दररोज नित्यपुजा पहाटे ४ ते ५, महानैवेद्य सकाळी १०.४५ ते
११, नित्योपचार गंधाक्षता- रात्री ८.३० ते ९.

      यावेळी मंदिर समितीचे  सह अध्यक्ष  गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य
श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर महाराज), व सल्लागार समितीचे सदस्य  अनिल अत्रे तसेच कार्यकारी अधिकारी  राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)