भाळवणी ता. पंढरपूर (प्रतिनिधी) - प्रतिवर्षाप्रमाणे श्रीराम मंदिर शुक्रवार पेठ येथे सद्गुरू काशिनाथ महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. यावर्षी ही ५० वी पुण्यतिथी साजरी होत आहे त्यानिमित्ताने शनिवार दिनांक २ डिसेंबर व ३ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी रात्री ८:००वा महाराष्ट्रातील ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे सुश्राव्य कीर्तन होणार असून त्यांना तबलासाथ ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम वैभव केंगार करणार आहेत.तसेच रविवारी सकाळी पासून गेली वर्षभर सद्गुरू काशिनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने १३ कोटी श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोक्षरी रामनामजपाचा संकल्प केला होता तो संकल्पपूर्ती सोहळा आणि काशिनाथ महाराज यांच्या समाधीवर भजन करीत पुष्पवृष्टी करण्यात येणार असून दुपारी आरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी सद्गुरू काशिनाथ महाराज शिष्य परिवार आणि भाळवणी येथील सर्व ग्रामस्थांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अरुणोदय सेवा न्यास शिष्य परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
गेली वर्षभर १३कोटी रामनाम जप करण्यासाठी सुदामा कलढोणे, विजय भागवत, महादेव दुधाणे, कल्याण कलढोणे, केशर टकले, जोशी परिवार मलकापूर, बंडू देशपांडे, भागवत शिंदे, त्रिवेणी कापसे तसेच जपकार प्रेमी यांनी अधिक परिश्रम घेत १३ कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण केला.