सा. ठिणगीने राखली
दिवाळी अंकाची परंपरा
पंढरपूर (प्रतिनिधी) - महाराष्ट्रामध्ये दीपोत्सवाचा कार्यक्रम सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा होतो. सोलापूर जिल्ह्यात सुट्टीच्या काळात वाचन संस्कृतीस उधान येते. त्यातच सर्वत्र सुट्टी असल्या कारणाने वाचकवर्गांना आवडीचा विषय हा "दिवाळी अंकाचा" विषय असतो. हीच परंपरा जपत साप्ताहिक ठिणगीने याही वर्षी दीपावली विशेषांकाचे प्रकाशन मोठ्या थाटामाटाने केले.
साप्ताहिक ठिणगीच्या दीपावली विशेषांकाचे प्रकाशन हरिभक्ती परायण पूजनीय प्रसाद महाराज अमळनेरकर यांचे मठामध्ये त्यांचे शुभहस्ते करण्यात आले. पूजनीय प्रसाद महाराजांनी अंकाचे प्रकाशन करून आपले आशीर्वाद दिले.
यावेळी साप्ताहिक ठिणगीचे संपादक रामचंद्र सरवदे, उपसंपादक जयंत पुराणिक, श्री वैभव कुलकर्णी, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील, पत्रकार विनोद पोतदार, बागायतदार मोरे, पत्रकार लखन साळुंखे, पत्रकार रामकृष्ण बिडकर, भाविक भक्त उपस्थित होते.