राजू खरे यांनी स्वखर्चातून केले रस्त्याचे मुरमीकरण

0


मौजे हराळवाडी येथिल रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा

           मोहोळ (प्रतिनिधी) -   २४७ राखीव विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे नेते राजू खरे यांच्या संकल्पनेतून व स्वखर्चातून मौजे हराळवाडी तालुका मोहोळ येथे अंगणवाडी ते राजाभाऊ शेळके वस्ती येथील रस्त्याचे मुरमीकरण करून रस्ता करण्यात आला. त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक २९ आक्टोंबर रोजी राजू खरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
          यावेळी गावातील माता भगिनींनी त्यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले‌. त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभ आशीर्वाद दिले.यावेळी बोलताना राजू खरे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या माध्यमातून गावाला मोठ्या प्रमाणात शासनाच्या अनेक योजना आणू व त्यातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून देऊ व गावचा संपूर्ण विकास करू असा निर्धार यावेळी व्यक्त केला.

            यावेळी गावातील माजी सरपंच केशव शेळके, ग्रामपंचायत सदस्य कैलास आईवळे, ग्रामपंचायत सदस्य तम्मा पवार, रंगसिद्ध गावडे, बिराप्पा हराळे,  सत्यवान पुजारी, राजाभाऊ शेळके, महिबर पाटील, चंद्रकांत ढगे व इतर प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना मोहोळ विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश दादा पारवे, उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख उमाकांत करंडे, मोहोळ तालुका उपप्रमुख अमर सोनवले, युवा नेते गणेश जाधव, संजय भाऊ मस्के, बापू सुतार, चंदनशिवे सर, अनिकेत लोंढे, लखन वाघमारे, नोमिनाथ शिरसट, आकाश फडतरे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)