सर्वांच्या सहकार्यानेच महाआरोग्य शिबिर यशस्वी - शिवाजीराव सावंत सर

0
महाआरोग्य शिबिरात  लाखाहून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी

       पंढरपूर (प्रतिनिधी) - 'आरोग्याची वारी पंढरीच्या दारी' या महाआरोग्य शिबिराचे कार्तिकी यात्रेत आयोजन करण्यात आले होते. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने 65 एकर या परिसरात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.तानाजीराव सावंत तसेच शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सोलापूर मा. शिवाजीराव सावंत सर यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते.

        हे महाआरोग्य शिबिर 22, 23, 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत होते. या शिबिरामध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्याहून विठुरायाच्या दर्शनासाठी आलेली एक लाख पंचवीस हजाराहून अधिक भाविक भक्तांनी आपल्या आरोग्याची तपासणी या महाआरोग्य शिबिरात केली व काही रुग्णांचे उपचारही तातडीने करण्यात आले.
           दक्षिणकाशी समाजाला जाणाऱ्या पंढरपूर येथे सर्वात मोठी वारी म्हणजेच आषाढी एकादशी यावेळीही आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी मोठ्या प्रमाणात महाआरोग्य शिबीर राबवले होते. तसेच याही कार्तिकी एकादशी निमित्ताने महाआरोग्य शिबिर भरण्यात आले होते. यामुळे महाराष्ट्रातील आलेल्या असंख्य भावीक भक्तांना याचा लाभ झाला.

       या महाआरोग्य शिबिराची आज सांगता असून यावेळी सर्व डॉक्टर्स तालुका वैद्यकीय अधिकारी जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच महाराष्ट्रावरून कानाकोपऱ्यातून आलेली सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी आपापली कार्य पार पाडले व त्याबद्दल आभार ही मानले.

         याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत सर, दत्तात्रय सावंत, शिवाजीराव बाबर, विश्वजीत (मुन्ना) भोसले, संजय बंदपट्टे, नितीन शेळके, बालाजी बागल, ओंकार बसंवती, सर्व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आशासेवीका उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)