पंढरपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई

0

जबरी चोरी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींना अटक व मुद्देमाल हस्तगत 

              पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे ह‌द्दीत मौजे. वाखरी ता. पंढरपुर कार्तीकी वारीनिमित जनावरांचा बाझार पाहण्यासाठी यातील फिर्यादी शंकर सिताराम भालसिंग रा. वाळखी तालुका व जिल्हा अहमदनगर हे व त्याचे नातेवाकासोबत अकलुज येथुन दि. 22/11/2023 रोजी रात्री 10/30 वा. सुमारास मौजे. वाखरी ता. पंढरपुर येथे आले होते. त्यानंतर पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी रिक्षा भाड्याने करुन पंढरपुर येथे जात असताना यातील आरोपी रिक्षाचालक व त्याचे साथीदारांनी सदर रिक्षा हि बायपासमार्गे पद्‌मावती तलावाजवळ घेवुन गेले व त्या ठिकाणी रिक्षा थांबवुन अज्ञात रिक्षाचालक व त्याचे साथीदाराने फिर्यादी व साक्षीदार यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन त्याचे जवळील रोख रक्कम रुपये 58,500/- रु जबरदस्तीने काढुन घेतल्यामुळे पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं 538/2023 भा.द.वि. कलम 392 प्रमाणे दि. 23/11/2023 रोजी अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन गुन्हयातील आज्ञात आरोपींचे शोधकामी पंढरपुर ग्रामीण व पंढरपुर शहर पोलीस ठाणे कडील पोलीस पथके नेमण्यात आली होती. सदर गुन्हयाचा कौशल्यपुर्ण तपास करून सदर गुन्ह्यातील तिन आरोपी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली रिक्षा निष्पन्न करुन सदर गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करून गुन्ह्यातील गेलेली रोख रक्कम आरोपीतांकडुन हस्तगत करण्यात आली आहे.
          सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे सोलापुर ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधिक्षक हिमंत जाधव सोलापुर ग्रामीण, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पंढरपुर विभाग पंढरपुर याचे मार्गदर्शनाखाली पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाणेकडील पौनि शिरीष हुंबे, पोसई मास्ती दिवसे, सपोफौ आप्पासाहेब कर्चे, पोहेकों राहुल शिंदे, पोना गणेश इंगोले व पंढरपुर शहर पोलीस ठाणेकडील सपोफौ राजेंद्र गोसावि, सपोफौ शरद कदम, पोना प्रसाद आवटी यांनी केली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांचे मार्गदर्शनाखाली पोसई मारुती दिवसे करीत आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)