मराठा आरक्षण मागणीसाठी आता रिपब्लिकन पक्ष मैदानात

0
पंढरपूर तहसील कार्यालयावर निदर्शने करून  केले आंदोलन

           पंढरपूर (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गट मैदानात उतरला आहे. पंढरपूर तहसिल कार्यालयावर बुधवारी भव्य निदर्शने करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी एस.सी, एस.टी व ओ.बी.सी. या समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली.
           यावेळी प्रदेश सचिव सुनिल सर्वगोड, महा.प्रदेश सदस्य आबासाहेब दैठणकर, प.महा.सरचिटणीस जितेंद्र बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद कांबळे, शहराध्यक्ष ॲड.किर्तीपाल सर्वगोड, तालुकाध्यक्ष संतोष पवार, शहर सरचिटणीस सचिन गाडे, शहर कार्याध्यक्ष विजय खरे, युवक शहराध्यक्ष विशाल मांदळे, तालुका सरचिटणीस दयानंद बाबर, तालुका कार्याध्यक्ष सचिन भोसले, शाहू सर्वगोड, पोपट क्षिरसागर,राजू ढवळे, सुखदेव माने, महेंद्र शिंदे, राजकुमार भोपळे, दत्ता वाघमारे, समाधान आठवले, राजू शिंदे, अजिंक्य चंदनशिवे, युवक उपाध्यक्ष अक्षय कदम, रुपेश वाघमारे, अविनाश आवचारे, अतिश हाडमोडे, ॲड.गौतम भालेराव, बापू खिलारे, ॲड.रोहित एकमल्ली, ॲड.प्रणय कांबळे, संदेश माने, अजिंक्य ओहाळ, सूरज साखरे, उमेश सर्वगोड, आदीसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)