आनंदाचा शिधा दुकानातून घराघरात...

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) --- राज्य शासनाकडून मान्य शिधापत्रिका धारकांना व गोरगरिबांना अल्प दरात म्हणजे शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा हा उशिरा का होईना शासनमान्य स्वस्त दुकानातून गरिबांच्या घरात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. 
         शासनाने २५ ऑक्टोबर पासून हा आनंदाचा शिधा वितरित करण्याची घोषित केली होते परंतु काही कारणास्तव तो वितरित झाला नाही काही गोष्टीचा अपवाद वगळता यांना वितरण व्यवस्था व ठेकेदार कारणीभूत आहेत असे बोलल्यास गैर ठरणार नाही.
दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला तरी आनंदाचा शिधा दुकानातून उपलब्ध नव्हता याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास जिल्हा सचिव सुहास निघते तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये जिल्हा संघटक दीपक इरकल तालुका उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे तसेच संघटक महेश भोसले दिलीप पंदे आदींनी पाठपुरावा केल्यानंतर आनंदाचा शिधा वितरित होण्यास सुरुवात झाली. याबाबत विभागीय पुरवठा आयुक्त व प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी तातडीने सूत्रे हलवून आनंदाचा शिधा स्वस्त धान्य दुकान मधून पोहोचवून शिधापत्रिका धारकांना वितरित करण्यासाठी उपलब्ध केला त्यामुळे उशिरा का होईना आनंदाचा शिधा दुकानातून घराघरातून आत्ता पोचू लागला आहे यामुळे सर्वांना आनंदाचा शिधा शंभर रुपयात मिळणार आहे त्यामुळे शिधापत्रिका धारकातून आनंद व्यक्त व समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)