८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर डाॕजबाॕल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये प्रांजली काळे व प्रांजली जगदाळे यांना सुवर्णपदक

0
     पंढरपूर (प्रतिनिधी) -  दि. १ ते ५ नोव्हेंबर २०२३ रोजी डाॕजबाॕल फेडरेशन आॕफ इंडीया संलग्नित गुरू नानक इंग्लिश स्कूल शिवपूर - वाराणसी (उत्तर प्रदेश) व  वाराणसी डाॕजबाॕल असोशिएशन आयोजित ८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र डाॕजबाॕल असोशिएशनच्या मुला - मुलींच्या संघास सुवर्णपदक प्राप्त....
            या स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने उत्तरप्रदेश संघास ५ गुणांनी व मुलांच्या संघाने कर्नाटक संघावर अंतिम सामन्यात ८ गुणांनी विजय मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत दुहेरी अजिंक्यपद पटकावून महाराष्ट्राचे वर्चस्व कायम ठेवले.विशेष म्हणजे यावर्षी महाराष्ट्र संघात सोलापूर जिल्ह्यातील वसंंतराव काळे प्रशालेतील कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या कु.प्रांजली काळे (१० वी) व कु.प्रांजली जगदाळे (८ वी) या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली....
        मुलींच्या पहिल्या सामन्यामध्ये राजस्थान संघाविरूध्द १० गुणांच्या फरकाने विजय संपादन केला. त्यानंतर कर्नाटक , हरियाणा संघास पराभूत करून अंतिम फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले. व अंतिम सामन्यामध्ये उत्तरप्रदेश संघास पराभूत केले. महाराष्ट्र संघाचा दबदबा कायम ठेवला.....
         महाराष्ट्र संघातील मुला - मुलींचे सराव शिबीर गंगापूर - संभाजीनगर येथे २७ ते ३० आॕक्टोंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या राज्य संघाचे प्रशिक्षक मा.आशिष जगताप - शरद बडे व व्यवस्थापक - कोमल गहलोद यांनी मार्गदर्शन केले.....

           महाराष्ट्र संघाने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळविल्याबद्दल राज्य डाॕजबाॕल असोशिएशनचे महासचिव मा.डाॕ.हनुमंत लुंगे सर ( अमरावती ) , उपाध्यक्ष मा.राजेश जाधव ( जळगांव ) , मा.अतुल पडोळे ( अमरावती ) , मा.प्रफुल्ल गाभाणे ( अमरावती ) , सोलापूर डाॕजबाॕल असोशिएशनचे सचिव मा.सुदेशजी मालप , मा.शिवाजीराव पाटील सर ( मंगळवेढा ) आदींनी राष्ट्रीय विजेत्या महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक - व्यवस्थापक - खेळाडूं यांचे अभिनंदन केले...

         महाराष्ट्र राज्य मुलींच्या संघात सोलापूरचे ३ मुली व १ मुलगा असे ४ खेळाडूं होते.त्यामध्ये कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबच्या प्रांजली काळे व प्रांजली जगदाळे या दोन खेळाडूं होत्या. या खेळाडूंस प्रशिक्षक फिरोज पठाण व क्रीडाशिक्षक प्रा.संंतोष पाटील सर, गौतम लामकाने सर यांचे मार्गदर्शन लाभले.....

          या यशाबद्दल श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व K K स्पोर्टस् चे सर्वेसर्वा मा.कल्याणरावजी काळे साहेब , सचिव मा.बाळासाहेब काळे गुरूजी , संचालिका व मार्गदर्शिका मा.सौ.संगिताताई काळे वहिनीसाहेब , मा.विलासरावजी काळे , युवानेते मा.समाधानदादा काळे , प्राचार्य मा.डी.एस.खरात सर , पर्यवेक्षक मा.एस.ए.काळे सर , संस्थेचे सर्व पदाधिकारी , प्राध्यापक-प्राध्यापिका , शिक्षक-शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी व हितचिंतक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)