पीएम किसान योजनेपासून शिरढोण गाव वंचित:

0
..तर पंढरपूर तहसील कार्यालयावर काढणार भव्य मोर्चा 

           पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील 464 शेतकऱ्यांना गेली दोन वर्षापासून पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी तहसीलदार सुशीलकुमार बेलेकर व तालुका कृषी अधिकारी यांना स्वतः व शिरढोन येथील लाभार्थी यांना घेऊन माहिती विचारली होती. त्यानंतर तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांना शिरढोन येथील प्रश्न मार्गी लावण्यात सांगितले असता त्यांनी शिरढोण येथे शिबिराचे आयोजन करून आधार कार्ड लिंकिंग व केवायसी पूर्ण करण्याचे काम केले आहे.परंतु त्यानंतरही पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेला नाही. शिरढोण गावातील शेतकरी जवळपास 56 लाख रुपयांपर्यंत अनुदानास मुकले आहे.तसेच कृषी विभागाकडून माहिती घेतली असता त्यांनी महसूल विभागाने वरील शेतकरी यादीमध्ये समाविष्ट आहेत अशी माहिती दिली आहे तरी सर्व शिरढोण येथील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत ऍक्टिव्ह करणे साठी आपण प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात ही विनंती. अन्यथा दिनांक 17 नोव्हेंबर 2023 रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विजय भुसनर यांनी दिली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)