मोहोळ मध्ये होत आहे उद्योजक राजू खरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक

0
उद्योजक राजू खरे यांच्या नव्या संकल्पनेचे जनतेतून होत आहे कौतुक

               मोहोळ (प्रतिनिधी) - 247 मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गाव भेट दौऱ्यादरम्यान मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे जनतेचे भावी आमदार राजाभाऊ खरे यांनी मौजे येवती येथील रहिवासी सुदर्शन विलास खुर्द हे किडनीच्या आजाराने पुणे येथील डी वाय पाटील हॉस्पिटल येथे उपचार घेत असून त्यांची परिस्थिती हालाखीची आहे व त्यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ही गोष्ट सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख चरणराज चवरे यांनी राजाभाऊ खरे यांच्या कानावर घातली असता त्यांनी सामाजिक भावनेतून तात्काळ पेशंटचे बंधू स्वप्निल विलास खुर्द यांच्याकडे रोख स्वरूपात पन्नास हजार रुपये उपचाराकामी मदत केली. यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख चरण राज चवरे यांनी  राजाभाऊ खरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले
व मोहोळ विधानसभा मतदारसंघाला राजाभाऊ खरे यांच्या सारखा प्रामाणिक व जनसेवेसाठी झटणारा नेता उमेदवार म्हणून मिळाला हे आम्हा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचे भाग्य आहे. त्यांच्या माध्यमातून भविष्यात मोहोळचा आम्ही सर्व शिवसैनिक विकास करू ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

           यावेळी मोहोळ तालुका उपप्रमुख नवनाथ बंडलकर, युवा नेते अण्णा गोडसे, सुधाकर चवरे, माऊली चवरे, धनाजी खराटे, अण्णा माने, बाळासाहेब चवरे, पैलवान महाराष्ट्र राज्य कुस्तीगार संघटना अमोल दादा चवरे, बाळासाहेब मुजावर, मनोज टेकळे! गोवर्धन चवरे, गणेश पांढरे, मुजावर सर, बाळासाहेब चवरे सर, चंदनशिवे सर, लखन वाघमारे, नोमीनाथ शिरसाट, अक्षय फडतरे व येवती व पेनुर येथील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)