श्री. शशिकांत दुनाखे सर कार्यालयीन अधिक्षक पदावरून सेवानिवृत्त

0
       पंढरपूर (प्रतिनिधी) - येथील श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ संचालित उमा महाविद्यालय पंढरपूर जिल्हा सोलापूरचे महाविद्यालय स्थापनपासून कार्यरत असणारे श्री. शशिकांत रघुनाथ दुनाखे सर गुरुवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी कार्यालयीन अधिक्षक पदावरून नियत वयोमानानुसार पस्तीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले.

         संस्थेचे विश्वस्थ युवानेते श्री. प्रणवजी परिचारक यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी युवानेते प्रणवजी परिचारक यांनी श्री. दुनाखे सरांनी केलेल्या सेवेबद्दल गौरव उद्गार काढले.
        यावेळी मा. प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे कार्यवाह मा. डॉ. मिलिंद परिचारक सर यांनी देखिल श्री. दुनाखे सरांना भावी आयुष्याबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)