दिवाळीपूर्वी मागण्या मान्य झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी संघटना इंटक व अखिल भारतीय मजदुर सफाई काँग्रेसच्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत निवेदन दिले होते. मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी कामगार नेते अँड.सुनिल वाळूजकर, नानासाहेब वाघमारे, शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, दिनेश साठे, दशरथ यादव,गुरु दोडिया, महेश गोयल, संदेश कांबळे, प्रितम येळे, जयंत पवार,राजन गोयल,संजय वायदंडे, गोविंदा सोनावणे,दत्तात्रय चंदनशिवे यांचे शी चर्चा झाली त्या प्रमाणे सर्व सफाई कर्मचारी सह इतर सर्व कर्मचारी यांना दिवाळी अग्रिम रू १२५००/- सातवा वेतन आयोग चावथ्या हफ्ता पोटी रू७५००/- असे प्रत्येकी रू २००००/- व जे सेवा निवृत्त कर्मचारी यांना ७ वेतन आयोग लागू आहे त्यांना रू५०००/- देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
सर्वांची दिवाळी गोड केल्या बद्दल उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषदेचे प्रशासक मा. गजानन गुरव साहेब व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव साहेब यांचे कामगार संघटनेच्या वतीने अँड. सुनील वाळूजकर यांनी आभार व्यक्त केले.