देहू येथीलआंदोलनास मुख्यमंत्र्यांची भेट
श्रीक्षेत्र देहू (प्रतिनिधी) - सद्गुरू संत श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या क्षेत्र देहू येथील ग्रामस्थ व वारकरी यांच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या आंदोलनास मुख्यमंत्र्यांनी भेट देत उपोषण कर्त्यांसमवेत चर्चा केली. विशेषत्वाने उपोषणकर्त्यांमध्ये संत श्री तुकाराम महाराजांचे वंशज व देहू ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य अशा ३५ जणांचा विशेष सहभाग आहे.
उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी देहू येथील गायरान जमीन शासनस्तरावरून इतर काही विभागास देण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. मात्र ती देहू गावासाठी राखीव ठेवण्यात यावी. कारण लाखो वारकरी वर्षभरात देहू या ठिकाणी वारीसाठी येत असतात.
उपोषणाकर्त्यांच्या मागण्या अगदी रास्त व महत्त्वाच्या आहेत. तात्काळ त्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे साहेबांपर्यंत पोहचविले आहे. श्री. अक्षय महाराज भोसले म्हणाले- मला विश्वास आहे की वारकरी हित पाहता मुख्यमंत्री महोदय याबाबत निश्चित योग्य तो सकारात्मक निर्णय घेऊन वारकरी संप्रदायाचा त्यांच्यावर असणारा विश्वास सार्थ करतील. उपोषण करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे संदर्भात सर्वांना निवेदन केले. येत्या काही दिवसातच हे आंदोलन संपुष्टात येऊन आपल्या मागण्या पूर्ण होतील हा विश्वास माझ्या बोलण्यातून दर्शविला. विभागीय आयुक्त सौरभजी राव यांच्याशी देखील या संदर्भात मी चर्चा करणार आहे. मागील काही बैठका त्यांच्या नेतृत्वात पार पडल्या आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यावेळी श्रीसंत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री. माणिकमहाराज मोरे, श्री. भानुदासमहाराज मोरे , विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती विश्वस्त श्रीशिवाजीमहाराज मोरे व मान्यवर उपस्थित होते.