पंढरपूर (प्रतिनिधी) - 28 नोव्हेंबर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रमुख पाहुणे मा. रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध खेळाडू सुमनताई गायकवाड या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक श्री. संतोष कवडे यांनी भूषवले .
महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वंचितांसाठी खर्च केले. दलित आणि महिलांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य अजरामर आहे. समाज दिवसेंदिवस धर्म भोळेपणाकडे जात आहे. आधुनिक युगात भोंदूगिरी वाढली आहे .समाजाला या विकारापासून वाचवायचे असेल तर आपणाला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गाने गेले पाहिजे, असे प्रतिपादन मा. रवींद्र गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी प्रशालेस त्यांनी वजन काटा व उंची मोजण्याचे उपकरण भेट दिले. समाज आपल्याला खूप देत असतो. आपणही समाजाच्या ऋणातून अंशतः तरी उतराई झाले पाहिजे.
'देणाऱ्याने देत जावे.....
घेणाऱ्याने घेत जावे....
घेता घेता एक दिवस.....
देणाऱ्याचे हात घ्यावे.'
या विंदा करंदीकर यांच्या ओळींची आठवण श्री. गायकवाड यांनी करून दिली. आपल्या रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका मा. सौ.सुनेत्राताई याही वंचितांसाठी चांगले काम करीत आहेत. त्यांचा आम्हाला अभिमान आहे असे श्री गायकवाड म्हणाले.
याप्रसंगी उभय दांपत्यांचा श्री रुक्मिणी विद्यापीठ व श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदिरच्या वतीने सत्कार करून त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. भोसले सर व इतर सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीयुक्त टापरे सरांनी केले.