पंढरपूर दि. १३ - साप्ताहिक पंढरी संदेशच्या सिद्धहस्त लेखिका, पंढरपुरातील ज्येष्ठ महिला विचारवंत, प्रवचनकार, व्याख्यात्या, महिला पत्रकार, ज्येष्ठ मुद्रिका, श्रीमती मानसी मार्तंड केसकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शांकुतल नगर इसबावी येथील राहते घरापासून दुपारी १ वाजता निघेल. योगीराज ऑफसेटचे श्री. मंदार केसकर यांच्या त्या मातोश्री होत.
श्रीमती मानसी ताई केसकर व पंढरी संदेश परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते होते. मानसीताईंचा अध्यात्माचा गाढा अभ्यास होता. श्रीज्ञानेश्वर मंदिरात होणाऱ्या हरिनाम सप्ताह त्या नेहमीच सहभागी असत. साप्ताहिक पंढरी संदेशच्या प्रत्येक कार्यात त्या सहभागी होत्या. त्यांनी गेली अनेक वर्षे नारी तू नारायणी या सदरातून अनेक अपरिचित महिला संतांची उकल करून नवीन पिढीसाठी त्यांची वेगळी ओळख आपल्या लेखणीतून त्यांनी करून दिली. जिल्ह्यातील अनेक वृत्तपत्रातून त्यांनी अध्यात्माचे लिखाण त्यांनी केले.
त्यांचे पश्चात दिर, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. साप्ताहिक पंढरी संदेश परिवार केसकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो ही श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना...🙏