पंढरपूर (प्रतिनिधी) - शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने रामकृष्ण हरी वृद्धाश्रम नवीन कराड नाका येथे दिवाळी सणानिमित्त भेटवस्तू देऊन दिवाळीचा आनंद येथील वृद्धांसमवेत द्विगुणीत करण्यात आला.
या भेटवस्तूमुळे वृद्धांनी सर्व उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा व शुभ आशीर्वाद दिले. व पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या व आमच्या वृद्धाश्रमास आपले सहकार्य लाभावे अशी भावना रामकृष्ण हरी वृद्धाश्रम येथील श्रीमती आशा गुजराती व श्रीमती निर्मला टेकाळे या आजींनी व्यक्त केली.
सदरच्या कार्यक्रमास शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूरच्या उपाध्यक्ष वृंदादेवी गोसावी वीरमाता, अमित गोसावी - सचिव, महेश म्हेत्रे- सहसचिव, अनिश गोसावी, अंशुल गोसावी, अनमित्रा गोसावी आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष वीरमाता वृंदादेवी गोसावी यांनी यापुढेही आपल्या रामकृष्ण हरी वृद्धाश्रम मधील सर्व वृद्धांना इथून पुढे आमचे प्रतिष्ठानच्यावतीने सहकार्य करू असे म्हणाल्या.
सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. महेश म्हेत्रे यांनी केले. रामकृष्ण हरी वृद्धाश्रम यांच्यावतीने श्रीमती आशा गुजराती यांनी आभार प्रदर्शन केले. आनंदी उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला असे संयोजक कळवितात.