पंढरपूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या कार्याची व गडकोट किल्याची माहिती मुलांना व्हावी म्हणून शिवभक्त प्रतिष्ठानवतीने प्रतिवर्षी किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या किल्ला स्पर्धेत ७० मुला-मुलींनी सहभाग घेतला. यश संपादन केलेल्या स्पर्धेकांना शिवभक्त प्रतिष्ठानचे वतीने किल्ला स्पर्धेची पारितोषीके देण्यात आली.
या स्पर्धेत मोठा गटामध्ये प्रथम क्रमांक- अभिषेक कुलकणी, व्दितीय- वरद बडवे, तृतिय- शुभम कुंभार, लहान गट प्रथम- विश्वराज कावळे, व्दितीय- श्रेया डांगे, तृतिय- रूद्र डांगे यांनी मिळविला. मुलांनी चांगले किल्ले केले असल्याचे दिसून आले. परिक्षक म्हणून सुधीर घोडके, अमोल दाभाडे, श्रीराम गणपुले, वैजीनाथ जाधव, अंबादास डांगे यांनी काम पाहिले. गेल्या १५ वर्षापासून शिवभक्त प्रतिष्ठान कडून दिवाळी सुटीत किल्ला स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.