तपकिरी शेटफळ येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

0


            पंढरपूर - किमान समान शिबीराअंतर्गत मंगळवार, दिनांक २८ नोव्हेंबर, २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तपकिरी शेटफळ येथे जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, , पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यायाधीश एस. ए. साळुंखे, यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

                        सदर शिबीरास शालेय मुला-मुलींना कायदेविषयक जनजागृती करण्यात येवुन त्यांना त्यांच्या हक्का विषयी माहिती देण्यात आली.

                        सदर शिबीरामध्ये पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री. अर्जुन पाटील, उपाध्यक्ष श्री. शिशिकांत घाडगे, विधीस्वयंसेवक श्री. नंदकुमार देशपांडे, श्री. सुनिल यारगट्टीकर, श्री. महेश भोसले, अॅड.श्री.अंकुश वाघमारे, प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)