मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

0

           मुंबई (प्रतिनिधी) - मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे.चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.

           लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर वातावरण पसरतं. गौरी सर्वगुण संपन्न असली तरी तिच्या काळ्या रंगामुळे तिला लग्नासाठी नवरा मिळणं कठीण झालं आहे. तिची नैराश्य अवस्थाही वाढत चालली आहे, पण तिला समजून घेणारा शाळेतला एक मास्तर तिच्या आयुष्यात आला आहे. गौरी मास्तराच्या प्रेमात पडली आहे खरं, पण मास्तर तिला स्वीकारेल का ?

         “या चित्रपटाच्या प्रीमियर संदर्भात, ‘नाही निर्मळ जीवन, काय करील साबण, तैसे चित्तशुद्ध नाही, तेथे बोध करील काई’ हे संत तुकारामांचे बोल आठवतात. माणसाचं सौंदर्य त्याच्या रंगावरून ठरत नसतं, तर मन साफ असावं लागतं, सांगणारा हा चित्रपट सादर करताना अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी. ई. ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies
*App link:*
 https://ultrajhakaas.app.link

*मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा प्रोमो पाहण्यासाठी लिंक*
https://www.facebook.com/UltraJhakaas
https://www.instagram.com/ultrajhakaas
https://www.youtube.com/@ultrajhakaas
https://twitter.com/ultrajhakaas

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)