सर्वपक्षीय व सर्वधर्मीय मेणबती मोर्चा
पंढरपूर (प्रतिनिधी) - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी लक्ष्मी टाकळीचे सरपंच संजय साठे, रामदास ढोणे, उपसरपंच महादेव पवार, ग्रामपंचायत सदस्य नागरबाई साठे, आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे, विजयमाला वाळके, रेश्मा साठे, रोहिणी साठे, रूपाली कारंडे, सागर सोनवणे, नंदकुमार वाघमारे, गोवर्धन देठे, शीतल कांबळे, रुक्मिणी जाधव, सुरेखा खपाले, समाधान देठे, धनाजी जाधव, सागर कारंडे, नंदकुमार वाघमारे, बाळासाहेब खपाले, सोमनाथ भाकरे, सुरेश टिकोरे, महादेव देठे, महादेव वाघमारे, मोहन आयरे, महादेव काशीद, शहाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थ साखळी उपोषणात सहभागी झाले होते.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी रात्री लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांच्या वतीने मेणबती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मी टाकळी गावातील सर्वपक्षीय व सर्वधर्मीय ग्रामस्थ या मार्चमध्ये सहभागी झाले होते. 'मनोज जरांगे पाटील आगे बढो.. हम तुम्हारे साथ है'... 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत ग्रामस्थांनी लक्ष्मी टाकळी गावातून फेरी पूर्ण केली.