पंढरपूर (प्रतिनिधी) -
सध्या जीवनामध्ये आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी पंढरपूर सारख्या शहरामध्ये हायटेक सुविधा निर्माण होत आहेत. अशात डॉ.शलाका शेडगे यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या लोटस क्लिनिकमुळे या सुविधांमध्ये भरच पडणार असून युवती, महिला व रूग्णांच्या आरोग्य समस्या सोडवण्यासाठी हे लोटस क्लिनिक यशस्वी होईल असा अशावाद माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी व्यक्त केला आहे.
पंढरपूर येथे डॉ .शलाका शेडगे यांच्या लोटस या क्लिनिकचे उद्घाटन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाशीम जिल्हा भुमीअभिलेख कार्यालयाचे अधिक्षक शिवाजी भोसले, अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रशांत निकम, डॉ.पाचकवडे, बाजार समितीचे संचालक दिलीप चव्हाण, अशोक शेडगे, डॉ.अनुजा शेडगे, ग्र.प.सदस्य उषा शेडगे यांच्यासह पदाधिकारी, ग्रमस्थ व शेडगे कुटूंबीय उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आमदार परिचारक यांनी सांगितले की, रोपळे सारख्या ग्रामीण भागातून मोठ्या जिद्दीने आपल्या मुलींना उच्च शिक्षण देवून त्यांना डॉक्टर केले. तर अशा जिद्दी आई वडीलांचे स्वप्न साकार करीत आई वडीलांच्या कष्टाचे चिज करणार्या दोन्ही डॉक्टर बहीणींचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. खरे पाहता शेडगे कुटूंबाने मुलींच्या शिक्षणाची मोठी प्रेरणा समाजा पुढे उभी केली आहे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर व रोपळे परिसरातील नेतेमंडळी , सामाजिक कार्यकर्ते व ग्रमस्थ उपस्थित होते. डॉ .अनुजा शेडगे यांनी उपस्थितांचे अभार मानले.
यशस्वी शिक्षणातून मुलांनी आई वडीलांचे स्वप्न साकारावे.......
आपल्या पाल्यांनी उच्च शिक्षण घेवून महत्वपुर्ण पदाला गवसणी घालावी अशी सर्वच आई वडीलांची आशा असते. त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी मुलांनी मोठ्या जिद्दीने शिक्षणाचे शिखर गाठले पाहीजे. डॉ .अनुजा आणि डॉ .शलाका यांनी याची जाणीव ठेवून आपल्या आई वडीलांचे स्वप्न सत्यात उतरवले आहे. याचा सर्वांच मोठा अभिमान आहे. आरोग्य सेवे बरोबरच सामाजिक सेवेचे मोठे कार्यही या भगीनींकडून भविष्यात होईल हिच अपेक्षा.
शिवाजी भोसले
जिल्हा भुमीअभिलेख कार्यालय अधिक्षक, वाशिम