पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने आवाहन

0
पाणी उकळून व गाळून प्यावे

            पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, पंढरपूर शहराला उजनी जलाशयातुन सोडणेत आलेले पाणी न.पा.च्या को.प. बंधाऱ्यात साठविले जाते व ह्या साठवलेल्या पाण्यावर योग्य ती निर्जतुकिकरण प्रक्रिया करुन शहरातील नागरिकांना पुरविले जाते.
          परंतु यावर्षी पाऊस काळ कमी झाल्याने गेल्या वर्षीचे उजनी जलाशयातील साठा केलेले पाणी नदीपात्रात सोडणेत आले आहे. या सोडण्यात आलेल्या पाण्यास हिरवट पिवळसर रंग असल्याने सदर पाण्यावर नगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्धीकरण व निर्जंतुकिकरण प्रक्रिया करून शहरास पाणी पुरवठा करण्यात येत आहे तसेच नगरपरिषदेव्दारे वेळोवेळी पाण्याचे नमुने तपासणी करिता शासकीय प्रयोगशाळा सोलापूर येथे पाठविणेत येतात. तरीही दक्षता म्हणून शहरातील नागरिकांनी सदरचे पाणी उकळून व गाळून पिण्यासाठी वापर करावा व नगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)