ऊस दर स्पर्धेत रंगत; चोख वजन काट्यासह भीमा देणार २७०० रुपये पहिली उचल - विश्वराज महाडिक

0
 

विश्वराज महाडिक यांच्याकडून धक्कातंत्र; चोख वजन काट्यासह भीमा देणार २७०० रुपये पहिली उचल

वाट पाहणार पण ऊस भीमालाच देणार; २७०० रुपये पहिली उचल देण्याच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांमधून सुर

         मोहोळ (प्रतिनिधी) -  भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर, गाळप हंगाम सन २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी पहिली उचल प्रति टन २७०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा चेअरमन विश्र्वराज महाडिक यांनी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊस दराच्या स्पर्धेत भीमाकडून सुधारित दर जाहीर केल्याने रंगत निर्माण होणार आहे. चोख वजन काटा आणि २७०० रुपये पहिली उचल यांमुळे भीमाला ऊस पाठवण्यासाठी शेतकरी वाट पाहण्यास तयार असल्याचा सुर पहायला मिळत आहे.
            भीमा परिवाराचे मार्गदर्शक तथा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी मोळीपूजन प्रसंगी २४०० रुपये प्रति मेट्रिक टन पहिली उचल जाहीर केली होती. दरम्यानच्या काळात इतर कारखान्यांकडून पहिली उचल जाहीर झाल्यानंतर चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुधारित २५२५ रुपये प्रति मेट्रिक टन पहिली उचल जाहीर केली होती. रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सुधारित २७०० रुपये प्रति मेट्रिक टन पहिली उचल जाहीर करत ऊस दर स्पर्धेत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. कोणतेही उपपदार्थ निर्मिती नसताना देखील इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देत विश्वराज महाडिक यांनी वेगळा आदर्श समोर ठेवला आहे. 

..२७०० रुपये उचल जाहीर होताच 'तो' ट्रॅक्टर थेट भीमाच्या केन यार्डात

         चेअरमन विश्वराज महाडिक यांनी सुधारित पहिली उचल देण्याची घोषणा केली. त्याबाबतचे मेसेज आणि स्टेटस व्हाट्सअप, फेसबुकवर व्हायरल झाले. कुरुल भागातील एका शेतकऱ्याच्या शेतात दुसऱ्याच कारखान्याची तोड चालू होती. मात्र भीमाची २७०० रुपये उचल समजताच त्या शेतकऱ्याने चोख काटा असल्याने टनाच्या मागे ३०० - ३५० रुपये जास्त फायदा होतो असं सांगत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला ऊसाने भरलेला तो ट्रॅक्टर थेट भीमाच्या केन यार्डात घेऊन जायला सांगितलं.

वजन काट्याच्या विश्वासार्हतेचा भीमाला असाही फायदा

        सध्या अनेक कारखान्यांच्या वजन काट्याबद्दल तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. मात्र उलटपक्षी गेल्या १०-१२ वर्षांपासून चोख वजन काट्यासाठी भीमा कारखाना जिल्ह्यात ओळखला जातो. त्यामुळेच भीमाला ऊस घालवल्यास वजनात येणाऱ्या तुटीमुळे नुकसान होत नाही असा शेतकऱ्यांना विश्वास आहे. पूर्वी 'वाट पाहीन पण एस टी नेच जाईन' अशी म्हण रूढ होती त्यात भीमाच्या काट्यामुळे 'वाट पाहणार पण ऊस भीमालाच देणार' अशी नवी म्हण प्रचलित झाली आहे. वजन काट्याविषयी स्पष्ट आणि स्वच्छ धोरण स्विकारल्यामुळे ऊस घालण्यासाठी शेतकऱ्यांची पहिली पसंती भीमालाच आहे. 

-------------------------------------------------

भीमाच्या दराशी स्पर्धाच होऊ शकत नाही - विश्वराज महाडिक
         सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये ऊस दरात स्पर्धेचं चित्र पहावयास मिळत असलं तरी भीमाच्या दराशी स्पर्धाच होऊ शकत नाही. उपपदार्थ निर्मिती नसताना आपण हा दर देत आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे चोख वजन काटा हे आपलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं स्पर्धा विचारात घेत असताना फक्त दराच्या आकड्यांचाच नाही तर भीमाच्या चोख वजन काट्याचा देखील सभासद विचार करतात. त्यामुळंच भीमाकडे ऊस घालवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल जास्त आहे.
-------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)