राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी वाडीकुरोलीच्या प्रिती काळेची महाराष्ट्र संघात निवड

0
             पंढरपूर (प्रतिनिधी) - गोवा येथे ४ ते ८ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या महिला संघात कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबची राष्ट्रीय जानकीपुरस्कारप्राप्त खेळाडूं कु. प्रिती काळे हिची निवड झाली आहे.

           महाराष्ट्र राज्याची निवड चाचणी स्पर्धा धाराशिव येथे झाली. या निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्याचे प्रातिनिधीक पुरुष - महिला संघ जाहीर करण्यात आले होते. या संघाचे सराव शिबीर क्रीडासंकुल बालेवाडी येथे संपन्न झाले. व पुरुष - महिला संघ स्पर्धेसाठी गोवा येथे दाखल झाला आहे. महाराष्ट्राच्या महिला संघात सोलापूर जिल्ह्याची राष्ट्रीय अष्टपैलू पहिली  जानकी पुरस्कारप्राप्त खेळांडू कु. प्रिती काळे हिची निवड झाली आहे. तिला वसंंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रा. संंतोष पाटील सर यांचे मार्गदर्शन लाभले.
            या यशाबद्दल महाराष्ट्र खो-खो असोशिएशनचे उपाध्यक्ष व सोलापूर अमॕच्युर खो-खो असोशिएशनचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष मा.महेशजी गादेकर साहेब , कल्याणराव काळे स्पोर्टस् क्लबचे सर्वेसर्वा मा.कल्याणरावजी काळे साहेब , भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव मा.चंद्रजीत जाधव साहेब , महाराष्ट्र राज्य खो-खो असोशिएशनचे सचिव मा.गोविंदजी शर्मा सर , मा.सचिव मा.संदिपजी तावडे सर , श्रीराम शिक्षण संंस्थेचे सचिव मा.बाळासाहेब काळे गुरूजी , सोलापूर अमॕच्युर खो-खो असोशिएशनचे सचिव मा.अजितकुमार संगवे , राज्य व जिल्हा खो-खो असोशिएशनचे सर्व पदाधिकारी , वसंतदादा शैक्षणिक संकुलाचे सर्व पदाधिकारी - शिक्षक - मार्गदर्शक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)