राष्ट्रीय लोकअदालतीत 131 प्रकरणे निकाली

0
5 कोटी 96 लाख  44 हजार रुपयांवर तडजोड

                पंढरपूर दि. (10):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 131  प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 5 कोटी 96 लाख 44 हजार 854 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी दिली.
     जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे शनिवार दिनांक 09 डिसेंबर 2023 रोजी या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.   या  लोकअदालतीसाठी एकूण 4 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा न्यायाधीश एम.बी.लंबे, दिवाणी न्यायाधीश एन.एस.बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश पी.पी. बागुल,  न्यायाधीश श्रीमती पी.एन.पठाडे यांनी काम पाहिले.
         या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक वादाची न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच बँका , वित्तीय संस्था, महावितरण यांची दाखल पुर्व प्रकरणे, आदी  प्रकरणे  ठेवण्यात आली होती.
       सदर लोकअदालतीस   विधिज्ञ, बँक कर्मचारी, महावितरणचे  अधिकारी,  न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)