युवानेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 210 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0
 युवानेते प्रणव परिचारक यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा

          पंढरपूर (प्रतिनिधी) :- पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त महा संकल्प करण्यात आला. यामध्ये 210 रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे आणि पांडुरंग कारखान्याचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे सर यांच्या हस्ते करण्यात आले. 

           "नाते रक्ताचे आपलेपणाचे" या ब्रीदवाक्याने प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा महा संकल्प करण्यात आला. गुरुवारी दिवसभर पांडुरंग भवन येथे रक्तदान शिबिरासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात २१० रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदानाचा हक्क बजावला. 

          युवा नेते प्रणव परिचारक यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरासोबतच विविध ठिकाणी पांडुरंग परिवार आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांकडून विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  विधायक पद्धतीने परिचारक यांचा वाढदिवस साजरा करत समाजापुढे पंढरपूर परिवारातील कार्यकर्त्यांनी एक नवा आदर्श प्रस्थापित केला. 
           याप्रसंगी गणेश अधटराव, सुभाष मस्के सर, पंडित शेंबडे, विक्रम शिरसट, राजाभाऊ कौलवर, अनंत कटप, बाळासाहेब कौलवार, विजय भुसणर, अक्षय वाडकर, अमित कसबे, तमिम इनामदार, महादेव गाढवे, संदीप कल्सुळे, विष्णू सुरवसे,  सूरज राठी, गुरू दौडिया, बालाजी वाघमारे, लक्ष्मण शिंदे, शुभम फाटे, हर्षल कदम, बालाजी बंदपट्टे, आबा पवार, बबन येले, एकनाथ गवळी, राजू घंटी, भाऊ टमटम, रोहन पवार, संमेध मुत्तीन आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)