22 जानेवारीला राज्यात दिवाळी साजरी करा

0


          मुंबई (वृत्तसंस्था) - अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचं निर्माणकार्य जोरात सुरु आहे. 22 जानेवारीला राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला राज्यात दिवाळी  साजरी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत.


22 जानेवारीला दिवाळी साजरी करा

      22 जानेवारीला राम मंदिर सोहळा पार पडणार आहे. मुंबईत देखील आपण दिवाळी साजरी करावी, मंदिर आणि महत्वाच्या इमारतींना विद्युत रोषणाई करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मुंबईतील 10 ठिकाणी वेगवेगळ्या आमदारांच्या नेतृत्त्वात सुरू होत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह उपक्रमात मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते, या कार्यक्रमात त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)