पंढरपूर (प्रतिनिधी) - सोलापूर लोकसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्क प्रमुख महेशनाना साठे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी १९ डिसेंबर रोजी पालकमंत्री यांना पूर्वी पाठविलेल्या पत्राचे स्मरण पत्र दिले होते. यानुसार पालकमंत्री यांनी विशेष निमंत्रित सदस्य म्हणून महेश साठे, जिल्हा प्रमुख चरणराज चवरे, मनीष काळजे, महेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.