माढा तालुक्यातील कुर्डू, बावी या गावांच्या नागरिकांच्या मागणीसाठी आवाज उठवणार - चेअरमन अभिजीत पाटील

0
अभिजीत पाटील यांनी नागपूर येथे माढा तालुक्यातील नागरिकांनी केलेल्या उपोषणास दिला पाठिंबा
       पंढरपूर  (प्रतिनिधी) - दि. ११ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान माढा तालुक्यातील कुर्डू येथील व जवळपासचे १३ गावचे ग्रामस्थ नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे बेमुदत उपोषणास बसले असता त्यास राष्ट्रवादीचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपोषणास पाठिंबा दिला.
         मौजे कुर्डू ता. माढा या गावालगत असलेल्या बेंद ओढ्याला अजनी धरणातून सिना - माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास मौजे कुर्डू, आंबाड, पिंपळखुंटे, चौंभे -पिपरी, कुर्डुवाडी, भोसरे, वेताळवाडी, वडाचीवाडी, रंणदिवेवाडी, वडशिंगे, तडवळे, उंदरगांव व महातपुर या १३ गावांना त्याचा फायदा होणार आहे. ओढ्यास पाणी आल्यास जवळपास ३५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र प्रत्यक्षात सिंचनाखाली येणार आहे. यासाठी अनेक वर्षापासून अनेक आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून हा विषय शासनाच्या दारी मांडलेला आहे. परंतु त्याची अद्याप शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यासंदर्भात उपोषणातील प्रमुख मागण्या -
          १) सिना माढा सिंचन योजनेचे शिराळ ते कुर्डू राहिलेले अर्धवट काम पूर्ण करणे.
         २) सिना माढा सिंचन योजनेची शिल्लक पाईपलाईन शेडशिंगे येथे आणणे अथवा भिमा सिना जोडकालव्यातून बेंद ओढ्यात पाणी सोडणे.
         ३) वरील योजनेच्या माध्यमातून बेंद ओढ्यात पाणी सोडून कुर्डू व परिसरातील १३ गावांचा पाणी प्रश्न सोडविणे.
         
        तसेच बावी ता.माढा येथील पाणी संघर्ष समितीने देखील  हक्काच्या पाण्यासाठी बेमुदत साखळी उपोषण बसले आहेत, सिना - माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडल्यास मौजे बावी, तुळशी, परितेवाडी, पिंपळखुटे या  गावांना त्याचा फायदा होणार आहे. “धरण उष्याला, अन कोरड घश्याला" अशी गावातील नागरिकांची दैनी अवस्था निर्माण झाली आहे. यासाठी अनेक वर्षापासून अनेक आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून हा विषय शासनाच्या दारी मांडलेला जातोय परंतु लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष नसून शेतकऱ्यांना थेट नागपूर येथे उपोषणास बसण्यासाठी वेळ आली असून तरीदेखील अद्याप शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. माझी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच आमदार रोहित पवार यांना सोबत घेऊन या सर्व प्रश्नांवर अभिजीत पाटील आवाज उठवणार असल्याचे श्री अभिजीत पाटील यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री भाऊसाहेब महाडिक, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य देखील उपस्थित होते..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)