शिक्षकांनी केवळ विद्यार्थी च नव्हे तर भारताचे सुजाण नागरिक घडवावे : रोहन परिचारक

0
कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये ''इफेक्टिव्ह टिचिंग टेक्निक्स" या विषयावर  कार्यशाळा संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी) ---
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) नवी दिल्ली व कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या मेकॅनिकल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये सर्व शिक्षकांसाठी ''इफेक्टिव्ह टिचिंग टेक्निक्स" या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेसाठी एकूण ४५ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे उद्घाटन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन श्री रोहन परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी बोलताना श्री रोहन परिचारक म्हणाले की शिक्षकानी केवळ विद्यार्थी न घडविता भारताचे सुजाण व जबाबदार नागरिक घडवावेत. चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत यासाठी शिक्षक विद्यार्थि यांच्यातील सुसंवाद वाढला पाहिजे असे सांगून त्यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. प्रत्येक विद्यार्थ्याच्या बौधिक पातळीवर जाऊन शिकविण्यासाठी शिक्षकांनी विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत आणि त्यासाठीच ही कार्यशाळा आयोजित केली आहे असे सांगून त्यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. 

पहिल्या दिवशी कार्यक्रमात बोलताना प्राध्यापक पी एस रेवणकर यांनी "क्लासरूम टीचिंग" विषयावर सखोल मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी साज कन्सल्टन्सी सोलापूर चे प्रोप्रायटर एस के जेऊरकर यांचे मार्गदर्शन लाभले तिसऱ्या दिवशी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. एच के अभ्यंकर यांनी "संस्थेच्या विकासात शिक्षकांचा सहभाग" या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षकांसाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे यावर त्यांनी भर दिला. चौथ्या दिवशी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटका चे डॉ. विष्णु शिंदे यांनी "क्लासरूम टीचिंग टेक्निक्स" या विषयावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यातील बारकावे शिक्षकांना समजावून सांगितले.

पाचव्या दिवशी कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चे माजी प्रिन्सिपॉल व झील कॉलेज पुणे येथील डॉ.अरुण गायकवाड यांनी "इनोव्हेशन इन पॅडॉगोजिकल अॅप्रोचेस" या विषयावर शिक्षकांशी संवाद साधला. त्यानंतर संगमेश्वर महाविद्यालयाचे डॉ. गणेश मुडेगावकर यांनी सहभागी प्राध्यापकांना वेगवेगळ्या उपक्रमांमधून प्रोत्साहित केले. सहाव्या दिवशी सर्व शिक्षकांसाठी इंडस्ट्रियल व्हीसीट चे आयोजन करण्यात आले होते. कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे डॉ. अभय उत्पात, प्रा. अनिल बाबर, प्रा. अभिनंदन देशमाने, प्रा. दीपक भोसले, प्रा. एस एम लंबे, प्रा. आशिष जोशी या प्राध्यापकांनी देखील कार्यशाळेतील उपस्थित प्राध्यापकांना विशेष मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रमावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख  प्रा.राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दिपक भोसले, प्रा. एस एम लंबे, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर च्या कार्यशाळेला प्रा. यु आर कार्वेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)