श्रीक्षेत्र नीरा- नरसिंहपूर ता. इंदापूर (प्रतिनिधी) :- या वर्षीचा धनुर्मासारंभ मार्गशीर्ष शुक्लपक्ष त्रयोदशी रविवार दिन. १७ डिसेंबर २०२३ ते धनुर्मास समाप्ती पौष शुक्लपक्ष पुत्रदा एकादशी भोगी पर्यंत १४ जानेवारी २०२४ पर्यंत आहे.
श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपुर येथे धनुर्मासात उष:काळातच श्रीहरीची पूजा केली जाते. आणि मुग्दान्न (खिचडी) समर्पण केली जाते.
धनुर्मासात अरुणोदयकालातील देवपुजा उत्तम, नक्षत्र लुप्त झाल्यानंतरची पूजा मध्यम; सूर्योदयाचे वेळेची पूजा अधम, मध्याह्न केलेली पूजा
निरर्थक असे सांगितले आहे.
धनुर्मासामध्ये खिचडीचा श्रीस नैवेद्य करणारास हजार वर्षांचे पूजाफल एका दिवसात लाभते. धनुर्मासात खिचडीचा नैवेद्य दाखविल्याने श्रीस होणारा संतोष दुसऱ्या कोणत्याही व्रताने होत नाही. शत्रुजय, दीर्घायुष्य, धनसंपत्ती, वेदादी शास्त्राभ्यास, इत्यादी सर्व कार्यांसाठी धनुर्मासाची पुजा साधन आहे. मनातील इच्छा सर्व पूर्ण होतात, योग सिध्द होतो, प्रत्येक जन्मात वैष्णव होऊन
जन्मण्याचे महाभाग्य लाभते.
हुग्गि-खिचडी बनविण्याची पध्दत :- तांदुळाइतकेच प्रमाणात मुगाची डाळ मिसळून तयार केलेली खिचडी उत्तमोत्तम; तांदुळाच्या प्रमाणात अर्धी मुगाची डाळ मिसळल्यास मध्यम; तांदळाच्या प्रमाणापेक्षा पाव भाग मुगाची डाळ मिसळल्यास अधम; तांदळाच्या दुप्पट प्रमाणात मुगाची डाळ मिसळल्यास अधिक श्रेष्ठ असा कांही मुनिश्रेष्ठांचा अभिप्राय आहे;
आपल्या शक्तीनुसार श्रेष्ठ रीतीने खिचडी तयार करुन नैवेद्य दाखवावा;
कोणत्याही प्रसंगी मुगाच्या डाळीचे प्रमाण तांदळाच्या अर्ध्या प्रमाणापेक्षा कमी न होईल अशी दक्षता घ्यावी.शास्त्रोक्त विधीने “हुग्गि-खिचडी” बनवून भगवंताला समर्पण केल्यास, तो आपल्यावर अनुग्रह करुन सकल भोग तसेच शेवटी मोक्ष ही देतो.
एकदा इंद्रदेव राज्यभ्रष्ट झाले असता श्रीदेवीने हुग्गि-खिचडीचा नैवेद्य दाखवून महालक्ष्मीची या व्दादश
नामांनी स्तुति केली. त्याचे फळ म्हणून इंद्रदेवाला पुन्हा राज्य मिळून ते सुखी झाले; म्हणून भगवंताला हुग्गि-खिचडी
समर्पण केल्यावर लक्ष्मीव्दादशनाम स्तोत्राचे अवश्य पठण करावे.
धनुर्मासात श्रीक्षेत्र नीरा-नरसिंहपूर येथे श्री नरहरीस त्रिवर्ग ब्रह्मवृंद सोवळ्यात उपस्थीत राहुन वेदघोष करतात. आपल्या घरुन खिचडी नैवेद्य बनवून आणतात आणि श्रीस समर्पण करतात. ही पहाटेची श्रीची पूजा पाहण्याचा एक वेगळा आनंद आणि समाधान असते. सर्वांनी यांचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपली प्रथा आणि परंपरा आहे.!.याप्रसंगी नृसिंह भक्तांची पहाटे गर्दी असते..
धनुर्मासात पठण करावयाचे लक्ष्मी स्तोत्र :-
श्रीदेवी प्रथमं नाम व्दितीयममृतोद्भवा ।
तृतीयं कमला प्रोक्ता चतुर्थं लोकसुंदरी।।
पंचमं विष्णुपत्नीति षष्ठं श्रीवैष्णवीति च ।
सप्तमं तु वरारोहा अष्टमं हरिवल्लभा ।।
नवमं शार्ड.ग्णी प्रोक्ता दशमी देवदेविका ।
एकादशी महालक्ष्मी: व्दादशं लोकसुंदरी।।
श्री पद्मा कमला मुकुंदमहिषी लक्ष्मीस्त्रिलोकेश्र्वरी ।
या क्षीराब्धिसुताऽरविंदजननी विद्या
सरोजात्मिका ।।
सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नामानि यो
व्दादश ।
प्रात : शुध्दता पठंति सततं सर्वान्
लभंते शुभान् ।।
भद्रलक्ष्मीस्तवं नित्य पुण्यमेतुच्छभावहम् ।
तौलौ स्नात्वाऽपि कावेर्यां जप
श्रीवृक्षसन्निधौ ।।
शुभं भवतु ।
।श्री लक्ष्मी नृसिंहार्पणमस्तु । 🙏