सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद !

0
           मुंबई (प्रतिनिधी) - नुकताच आलेल्या "आटा पिटा" गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं रसिकांच्या मनावर हळवा प्रभाव पाडत असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अविश्वसनीय प्रतिसाद येत आहे.
           ‘मन हे गुंतले’ गाणं ‘सुनिधि चौहान’ यांनी गायलं असून ‘गौरव चाटी’ यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे आणि ‘शिवम बरपंडे’ यांनी लिहिलं आहे. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून संदीप मनोहर नवरे यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी प्रमुख भूमिकेत दिसणार असून मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते झळकणार आहेत.
        “संगीत म्हटलं की मन अगदी उल्हासित होऊन जातं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकाच्या मनाला उल्हासित करण्यासाठी सुनिधि चौहान हिच्या सुरेल आवाजातलं गाणं सादर करत असताना आमचा आनंद गगनात न मावणारा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
*ट्रेलर  पाहण्यासाठी CHHAPA KAATATRAILER*
https://drive.google.com/file/d/1X2dH2xNM1zvoBY_8De3eHjR2WeC_6Jxq/view?usp=sharing
*अधिक माहितीसाठी*
Facebook : https://www.facebook.com/UltraMarathi
Twitter : https://twitter.com/UltraMarathi
News Keyword 
@TheMovieChhapaKata
@UltraMusic 
@UltraMusicMarathi
@UltraMediaandEntertainmentPvtLtd
@sunidhichauhan
@marathimelody
@marathimusic
@marathiclasicmusic
@MakarandAnaspure
@TejaswiniLoniri
@VijayPatkar
@15December2023ChhapaKaata
@SushilkumarAggarwal
@SandeepManoharNavare
@ShyamMalekar

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)