पंढरपूर (प्रतिनिधी) - आज मोक्षदा एकादशी, गीता जयंती व गणितीज्ञ रामानुजन यांच्या जयंती निमित्त प्रशालेत श्रीकृष्ण व भगवत गीता, रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन माजी नगरसेवक व भागवत प्रवचनकार श्री. ऋषीकेश उत्पात यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गीतेच्या १८ व्यां अध्यायाचे श्लोक म्हंटले.
श्री ऋषीकेश उत्पात यांनी श्रीमद् भगवत गीतेचे महत्व व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने कसे आचरणाचे व महत्वाचे आहे; आज गीतेचे सोपे सहज समजाणारे अनेक ग्रंथ, पुस्तिका किंवा सोशल मिडियावर आपण मिळवू शकतो त्याचे अध्ययन विद्यार्थीदशेतच केल्याने निश्चितच आपली प्रगती व आपली संस्कृती आपणास माहिती होईल असे सांगितले.
प्रशालेच्या वतीने ऋषीकेश उत्पात यांचा सत्कार पर्यवेक्षक अनिल अभंगराव यांनी केला, कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षक बंडोपंत गुलाखे, आबासो खरात, नरेंद्र डांगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन संस्कृत शिक्षिका सौ दुर्गा हरिदास यांनी केले, कार्यक्रमास विद्यार्थी व सर्व शिक्षक सहभागी उपस्थित होते