पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी श्रावणी दत्तात्रय भोसले हिने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक संपादन करून घवघवीत यश मिळविले आहे.
जिल्हास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा पापरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये पार पडल्या. यामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 22 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामधून विशेष वक्तृत्व सादर करीत श्रावणी भोसले हिने द्वितीय क्रमांक पटकावला. यावेळी विस्तार अधिकारी बंडू शिंदे, केंद्रप्रमुख श्रीकांत खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन श्रावणीचा सत्कार करण्यात आला.
या यशासाठी श्रावणीला शिक्षिका अश्विनी उबाळे, वर्गशिक्षक शशिकांत कांबळे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तर श्रावणीच्या या यशाबद्दल तिचे गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, केंद्रप्रमुख स्वाती डोंगरे, मुख्याध्यापक परमेश्वर गायकवाड, शिक्षक अरुण माळी, तानाजी ढेकळे, प्रमोद लोणारकर, समाधान आयरे, शिक्षिका पद्मिनी व्यवहारे, छाया कांबळे, वैशाली जगताप , वर्षा गोडसे, कल्पना माने, पालक दत्तात्रय भोसले, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.