पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांची प्रदक्षिणा यात्रा
खुप दिवसांचे स्वप्न पूर्ण --पंडीत प्रदिप मिश्रा
पंढरपूर प्रतिनिधी---- महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या श्रीक्षेत्र पंढरी नगरीत पंडित श्री प्रदीप मिश्रा यांचे आगमन व स्वागत करण्यात आले ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे येऊन दर्शन घेतले त्यांचा सोबत अभिजित पाटील हे होते यावेळी मंदिर समितीचे औसेकर जळगावकर वतीने त्याचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी आपल्या अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली तसेच येथे शिव महापुराण करण्याचे भाग्य मिळाले असे ते म्हणाले त्यांनी श्रद्धापूर्वक पंढरीरायाला नमन केले.
आज दिनांक २४ डिसेंबर रोजी सायं ५:३० वा. मोठ्या थाटामाटात उत्साहात पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांची *प्रदक्षिणा यात्रा* निघाली आहे... या यात्रेमध्ये हजारो भावी भक्त सहभागी झालेले दिसत आहेत. ही यात्रा इंदिरा गांधी चौक(शेट्टे पेट्रोल पंप) - भोसले चौक - अर्बन बँक चौक - भादुले चौक - छत्रपती शिवाजी महाराज चौक - चौफाळा - गांधीरोड - नाथ चौक - घोंगडे गल्ली - महाव्दार चौक - कालिकादेवी चौक - काळा मारूती चौक - चौफाळा या मार्गे निघाली आहे.
पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पंडित प्रदिप मिश्रा यांचे भव्य शिव महापुराण कथा दिनांक 25 डिसेंबर पासून दुपारी १ ते ४ या कालावधीत होणार आहे.तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे संयोजकांनी केले आहे.