आखटीवर भाजलेला गुळभेंडी हुरडा
पंढरपूर (प्रतिनिधी) - पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथे गावच्या मालकीचे असणाऱ्या चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्रातील हुरडा पार्टीचा हंगाम श्री. रणजीतसिंह शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.प्रणिता शिंदे यांच्या हस्ते आखटीची पुजा करून सुरुवात करण्यात आली. गेल्यावर्षीच्या चांगल्या प्रतिसादा नंतर याही वर्षी हुरडा पार्टी ला सुरुवात करण्यात आलेली आहे. यासाठी गुळभेंडी वाण असणारा हुरडा चिंचणी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये पेरला असून तो आता खाण्यासाठी उपलब्ध होत आहे.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की- चिंचणी या छोट्याशा गावाने स्वयंपूर्ण होण्यासाठी शेतीला पर्यटनाची जोड देत निवडलेला मार्ग अतिशय स्तुत्य असून पर्यटन हे क्षेत्र येणाऱ्या पर्यटकांना आनंद देते पण त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे उभे आहे त्या भागातील लोकांना रोजगार देते, त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मदत करते त्यामुळे पर्यटन क्षेत्र ज्या भागात आहे तेथील विकास झालेला दिसतो. आमदार बबनदादा शिंदे यांनी या गावासाठी वेगवेगळ्या माध्यमातून भरघोस निधी देऊन कायमच मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे. याच पद्धतीने भविष्यात कोणतेही राजकारण न करता चिंचणीकरांनी घेतलेल्या या अतिशय स्तुत्य उपक्रमाला आम्ही कायम मदत करू असे आश्वासित केले.
यावेळी गावातील महिला पुरुष तरुण मंडळी उपस्थित होते. यावेळी सविता सावंत मिरा सावंत दीक्षा अनपट कस्तुरा जाधव अंजना जाधव शकुंतला पवार लक्ष्मी धनवडे मिना सावंत बेबी जाधव वैशाली सावंत मनिषा जाधव मोहन सावंत सदाशिव सावंत शशिकांत सावंत चंद्रकांत पवार मोहन अनपट शिवाजी अनपट सूर्यकांत जाधव सुभाष खर्चे इ. ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.