श्रीक्षेत्र निरानरसिंहपूर ता. इंदापूर (प्रतिनिधी) - नीरानरसिंगपूर पंचक्रोशी व परिसरामध्ये दत्त जयंती उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली. श्रीलक्ष्मी नरसिंह मंदिरात एकमुखी दत्त यांची जयंती पुजारी , जोशी व ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संगम गावचे सरपंच श्रीयुत नारायणराव ताटे देशमुख यांनी दत्त मंदिराला फुलाची मोठी आरास, माळा व सजावट केली होती.. दत्तमूर्तीची महापूजा मुख्य पुजारी प्रसाद दंडवते व ग्राम जोशी आनंद महाराज काकडे यांनी केली. सर्वांना महाप्रसाद देण्यात आला या प्रसंगी विजयराव ताटे देशमुख यांचा लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
चैतन्य विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने इयत्ता आठवी या वर्गाच्या वतीने विद्यार्थ्यांनी दत्त जयंती साजरी केली. दत्त प्रतिमेची महापूजा माजी मुख्याध्यापक धनंजय दुनाखे यांनी केली. याप्रसंगी प्राचार्य गोरख लोखंडे सर वर्ग शिक्षक व ज्येष्ठ शिक्षक सुहास राऊत व श्रीमती निकते- पोरे मॅडम व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना दत्त जयतीचे पौराणिक महत्व श्री.दुनाखे सर यांनी विषद केले..
निरानरसिंहपूर येथे रामचंद्र ताटे देशमुख यांच्या वस्तीवर दत्त जयंती उत्साह साजरी झाली. याप्रसंगी ह भ प भोसले महाराज बेंबळेकर यांचे वारकरी सांप्रदायाचे सुश्राव्य कीर्तन झाले.सर्वांना महाप्रसाद वाटण्यात आला .पिंपरी बुद्रुक गावामध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे.. तसेच शेवरे गावांमध्ये शेवरे कॉलनी येथे दत्त जयंती उत्साह साजरी करण्यात आली तसेच शेवरे येथे लव सुतार यांच्या वस्तीवर दत्त जयंती ऊत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी सौ. विजया सुतार वहिनी यांनी दत्त जयंतीचे महत्त्व सर्वांना सांगितले तसेच टणू, गिरवी, संगम, या गावांमध्ये दत्त जयंती उत्साह साजरी करण्यात आली....दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा.!!! या जय घोषात व भजन करत दत्त जयती सोहळा पार पडला.