भाजपने तीन राज्यात बहुमतात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल पंढरीत मिठाई वाटून जल्लोष

0
        पंढरपूर (प्रतिनिधी) - नुकत्याच झालेल्या 5 राज्यातील  निवडणुकापैकी 4 राज्याचे निकाल आज लागले असून भारतीय जनता पक्षाने 3 प्रमुख राज्यात बहुमतात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.  भारतीय जनता पक्षाला तीन राज्यात मिळालेल्या निर्विवाद वर्चस्वाबद्दल पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

        यावेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सरचिटणीस मकरंदजी देशपांडे, जिल्हा सरचिटणीस शशिकांतजी चव्हाण, सरचिटणीस सिद्धेश्वरजी कोकरे, निवडणूक प्रमुख राजेंद्रजी सुरवसे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शनजी यादव, भाजपा पंचायत राज व ग्राम विकास विभाग जिल्हा सहसंयोजक प्रशांतजी सापनेकर, अभविपचे आनुपजी देवधर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)