जिल्हा नियोजनच्या बैठकीत आ. समाधान आवताडे आक्रमक

0
मतदारसंघातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी आ. आवताडे  आक्रमक

पालकमंत्र्यांकडून कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना

      मंगळवेढा (प्रतिनिधी) - नैसर्गिक दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस, विविध रोगांचा व कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे नासाडी झालेल्या पिकांचे पंचनामे होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही शेतकरी  पीकविमा व शासकीय मदतीपासून वंचित आहेत,अथक प्रयत्नांतून सुरु केलेली मंगळवेढा तालुक्यातील ४० गावची भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरु झाल्यानंतर गावांना पिण्याचे पाणी मिळत आहे, परंतु या योजनेसाठी वापरण्यात आलेल्या विजेचे एक ते सव्वा कोटी रुपये वीज बिल प्रलंबित होते त्यापैकी १० ते १५ लाख रुपये बिलाची रक्कम भरण्यात आलेली आहे. उरलेली बिल टंचाई मधून भरून ही योजना अखंडपणे सुरू ठेवा जर ही योजना विज बिलाअभावी बंद पडली तर तालुक्याच्या दक्षिण भागातील ४० ते ५० गावांमध्ये टँकर सुरू करावे लागणार आहेत आणि हा खर्च पुन्हा प्रशासनाला परवडणारा नसून मुबलक पाणीही मिळणार नाही त्यामुळे जिल्हा परिषद टंचाई अंतर्गत आवश्यक निधीची तरतूद करून वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावा,त्याचबरोबर पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत परंतु या केंद्रामध्ये आवश्यक वैद्यकीय स्टाफ तसेच औषध तुटवडा असल्यामुळे ही केंद्रे असून अडचण नसून खोळांबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या आरोग्यकेंद्राना औषध पुरवठा व स्टाफ भरती करा अशी आक्रमक मागणी करत आ समाधान आवताडे यांनी मतदार संघातील समस्या पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर मांडल्या.
       सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी घेण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ चा प्रारूप आराखडा सदर बैठकीमध्ये तयार करण्यात आला आहे.
        या बैठकीत बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या विकासाच्या अनेक सोयी- सुविधा मार्गी लागण्यासाठी जनसुविधा या हेडला अधिक निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जिल्ह्यातील रस्ते तसेच महावितरणला निधी वाढविण्यासाठी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी आग्रही भूमिका मांडली आहे.
      मतदार संघातील दळणवळण व्यवस्था सक्षम होऊन नागरिकांना दैनंदिन रहदारीसाठी व प्रवासासाठी चांगल्या स्थितीतील रस्ते बांधणीसाठी व रस्त्याच्या दुरुस्ती आणि सुधारणा साठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य महावितरण विभागांतर्गत वीज पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी नवीन डी.पी बसविणे व वाढीव डी.पी ची मागणी पूर्ण करण्यासाठी या विभागाला निधीची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

------------------------------------------------

       पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास दोन लाखाहुन अधिम पशुधन आहे परंतु अलीकडच्या काही दिवसांमध्ये वाढलेल्या थंडीमुळे जनावरांना लाळ खुरकुत या रोगाची साथ सुरु आहे. सोलापूर जिल्ह्याबाहेर सदर रोगावरील लसीकरण सुरु आहे; मात्र आपल्या जिल्ह्यात विशेषतः पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात या रोगामुळे अनेक जनावरे आजारी पडत आहेत परंतु त्यावर मुबलक प्रमाणात लसीकरण उपलब्ध नसून लसीकरणाचा आवश्यक पुरवठा उपलब्ध करण्याची मागणी ही आ. आवताडे यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर केली.
------------------------------------------------

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)