पंढरपूर (प्रतिनिधी) - ‘महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देण्याऐवजी व्यावहारिक आणि व्यवसायाभिमुख अनुभव देण्याच्या हेतूने ट्रेड फेअरचे आयोजन केले. यामधील सहभागी विद्यार्थ्यांनी दुकानदारी आणि व्यापाराचा अनुभव घेतला. ग्राहकांशी संवाद करणे, उत्पादनाची जाहिरात करणे, वस्तूचा दर ठरविणे, ग्राहकांना आकर्षित करणे, इतर व्यापाऱ्यांशी स्पर्धा करणे आदी कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात केली’.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात रुसा काम्पोनंट आठ अंतर्गत उद्योजकता विकास केंद्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ट्रेड फेअर, करिअर फेअर व वस्तू व विक्री आदींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, माजी सचिव, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. जे. जी. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी जनरल बॉडीचे सदस्य अमरजीत पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, मुख्याध्यापक जे. बी. भायगुडे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे आदी मान्यवर उपस्थित
होते.
या ट्रेड फेअरमध्ये सिनिअर, ज्युनिअर व व्होकेशनल विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. एकूण १५० तात्पुरत्या दुकानांची निर्मिती करण्यात आली व ही दुकाने विद्यार्थ्यांनी सामुहिक स्वरुपात चालविली. यात कांही दुकाने ही खाद्यपदार्थांची होती. या दुकानातील खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करून आणले. तर कांही विद्यार्थ्यांनी ती बाहेरून तयार करवून घेतले. यामध्ये वडा-पाव, पाव-भाजी, कच्ची दाबेली, शिरकुर्मा, दालच्या राईस, इडली सांबर, दही-वडा, शाबु-वडा, शाबु खिचडी, मसाला पापड, ओली- सुकी भेल, खमंग ढोकळा, मोमो, पाणी पुरी, भेळ पुरी, ढोसा उत्तप्पा, आईस्क्रीम, कुल्फी, फ्रुट सालेड, उसाचा रस, नारळ पाणी याचबरोबर शेतीतील रानमेवा यामध्ये बोरे, पेरू, हरभरा डहाळे, मक्याचे कणीस, पपई तर भाजीपाल्यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, शेवगा, घेवडा, वांगी, टोमॅटो आदी भाज्या होत्या. त्याचबरोबर फळांमध्ये केळी, मोसंबी, सीताफळ, सफरचंद, डाळिंब आदी फळांचा समावेश होता. इमिटेशन ज्वेलरी, हस्तकला वस्तू, पुस्तक विक्री, रोपवाटिका, इत्यादी दुकानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विक्री केली. या दुकानांच्या माध्यमातून
विद्यार्थ्यांनी हजारो रुपयांचा व्यापार केला.
बीबीयावेळी रेशीम उद्योग, टेलिस्कोप, पुस्तक प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, जुनी नाणी, वस्तू यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनास माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धीरजकुमार बाड, कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील प्राचार्य डॉ. सुनील हेळकर आदी
मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, शास्त्र विभागाचे उपप्राचार्य राजेश कवडे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, रुसा समन्वयक डॉ. चंद्रकांत काळे, प्रा. योगेश पाठक, प्रा. डॉ. राजाराम राठोड, प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. डॉ. समाधान माने, ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा. युवराज आवताडे, प्रा. डॉ. रमेश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे व कार्यालयीन प्रमुख प्रभाकर पारधी, सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल विभागातील शिक्षक, शिक्षकेतर
सेवक, विद्यार्थी, पालक आदींनी मोठ्या स्वरुपात सहभाग नोंदविला. सदर
उपक्रम यशस्वी करण्यासाठी समन्वयक अर्थशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मधुकर
अनंतकवळस, प्रा. डॉ. तुकाराम अनंत कवळस, प्रा. संतोष शहाणे, प्रा. डॉ.
धनंजय साठे, प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्रा. सागर शिवशरण, अभिजित जाधव,
सुरेश मोहिते, संजय जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.