आमदार समाधान आवताडे यांच्या विकास कार्यक्रमांतर्गत कामाचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळा

0
         मंगळवेढा (प्रतिनिधी) -  आमदार समाधान आवताडे यांच्या विकास कार्यक्रमांतर्गत कामाचे उद्घाटन व निरा भाडगरचे पाणी प्रथमच वड्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात पोचवून केले सभापती सोमनाथ अवताडे यांनी पूजन 
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न लोकप्रिय आमदार मा.श्री.समाधान दादा आवताडे साहेब यांच्या विकास  कार्यक्रमाअंतर्गत निधी मंजूर झालेल्या बोहाळी  (मोरे वस्ती) रस्ता" या विकास कामाचे भूमिपूजन युवा नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ मालक आवताडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
           मतदारसंघातील रस्ते, वीज व पाणी या मूलभूत विकास कामांच्या धोरणात्मक गतिमानतेसाठी आमदार महोदय हे सदैव सजग आणि तत्पर आहेत. गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यासाठी निधी मंजूर करुन आमदार साहेबांनी येथील स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन दळणवळण सुविधेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला
तसेच बोहाळी खर्डी उंबरगाव कोर्टी या गावांच्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तेथील सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी आमदार साहेब  यांच्याशी भेट घेऊन सर्वांना पाणी कसे मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू होता आमदार साहेबांनी वरिष्ठ पातळीवरून निरा व भाडगर या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठपुरावा केल्याने पाठीमागील चार दिवसापासून पाणी सोडण्यात आले व त्या पाण्याचे पूजन आज बोहाळी येथे  सभापती महोदय यांच्या हस्ते करण्यात आल्याने सर्व परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे
       यावेळी सरपंच शिवाजी पवार, उपसरपंच जगन्नाथ जाधव, ग्रा.प.स. बाळासाहेब जाधव, तानाजी रणदिवे, उमेश भोसले, द्रोणाचार्य हाके मेंबर, कल्याण कुसुंमडे, मोहन आप्पा बागल, सुधाकर जाधव पाटील, शांतिनाथ बागल, सुधाकर नाना फाटे, राजेंद्र हुंडेकरी, दत्ता आबा पाटील, शरीफ भाई शेख, दत्तात्रय कोळेकर, भास्कर घायाळ, प्रथमेश बागल, सुनील रणदिवे,विठ्ठल पाटील, बाळासाहेब जाधव, सोमनाथ कुसुमडे, पंजाब पवार, दत्ता जाधव, नाथ जाधव, राजेंद्र जाधव, राजेंद्र जाधव, कुबेर हजारे, बाळासो मोरे, पांडुरंग मोरे, अनिल मोरे, पुण्यवंत जाधव, नवनाथ शिंदे, बंडू हजारे सुनील जाधव, राजेंद्र जाधव, तुकाराम हजारे,अंकुश हजारे, गुरुनाथ मोरे, शिवाजी शंकर जाधव व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)