मोहोळ मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधींचा निधी मंजूर - आ. यशवंत माने
मोहोळ (प्रतिनिधी) - मोहोळ मतदारसंघांमध्ये पंढरपूर तालुक्यातील १७ गावे येत असून या १७ गावापैकी पंढरपूर ते कुरुल हा टाकळी सिकंदरला जोडणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते. हा रस्ता होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. निधी अभावी त्या रस्त्याचे काम थांबले होते. परंतु अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या रस्त्यासाठी २७१ कोटीचा निधी खेचून आणला यामुळे मोहोळ मतदारसंघातील रस्त्याचे प्रश्न मार्गी लागणार आहेत, अशी माहिती आमदार यशवंत तात्या माने यांनी दिली.
मोहोळ मतदार संघासाठी मिळालेला २७१ कोटीचा निधी
हा (एडीबीमधून) मिळाला असून १७४ कोटी मोहोळ मतदार संघाच्या विकासासाठी मिळाले आहेत. यामुळे येणाऱ्या कालावधीत मोहोळ मतदार संघाचा सर्वांगीण विकास करून या मतदारसंघांमध्ये अनेक वर्षापासून भेडसावत असणाऱ्या रस्त्याची समस्या आता दूर होणार आहे. मतदारसंघाच्या विकासामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत वाड्या वस्त्या पर्यंत पाण्याची सोय करण्यात आली आहे. विविध कामासाठी निधी उपलब्ध करून ती कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काही ठिकाणचे रस्ते राहिले होते; आज मिळालेल्या निधीमुळे राहिलेल्या रस्त्याची कामेही पूर्ण होणार असून मोहोळ मतदार संघाचा नक्कीच कायापालट होईल व सर्वांगीण विकास होईल, अशी माहिती आमदार यशवंत तात्या माने यांनी दिली.