प्रसाद लालबोंद्रेचे बॉक्सिंग स्पर्धेत यश !

0
 

              पंढरपूर (प्रतिनिधी) - माध्यमिक शालेय पुणे विभाग स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत आपटे उपलप प्रशाला पंढरपूर येथील 14 वर्षे वयोगटात चि. प्रसाद गजानन लालबोंद्रे (वजन गट 40 ते 42 ) याचा द्वितीय क्रमांक आलेला आहे. या स्पर्धा लोणी ता. राहता जि.अहमदनगर येथे दिनांक 28- 11-2023 रोजी झाल्या.
           आज त्याचा प्रशालेत मुख्याध्यापक दत्तात्रय धारुरकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसाद लालबोंद्रे यास मार्गदर्शन क्रिडा शिक्षक बी. एच. गुलाखे, एन. पी. डांगे व माऊली सितापराव यांनी केले यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक अनिल अभंगराव, ज्येष्ठ शिक्षक आबासो खरात, सुरेश कुसुमडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)