शिव महापुराण कथा सोहळ्यात केल्या पोळ्या, खरकटे काढले..भाविकांच्या सेवेत अभिजीत पाटील तल्लीन झाले !
पंढरपूर (प्रतिनिधी) :- चंद्रभागा मैदान पंढरपूर येथे श्री हरिहर शिव महापुराण कथा सोहळ्याचा चौथा दिवस अलोट गर्दी आणि भाविकांच्या प्रचंड उत्साहात संपन्न झाला.. सुप्रसिद्ध पंडित पूजनीय श्री.प्रदीप मिश्रा महाराज यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराणाच्या माध्यमातून असंख्य भाविकांना जगण्याचे ज्ञान आणि भक्तीचा भाव मिळत आहे..
कथेची लोकप्रियता दिवसागणिक वाढती असून भाविकांची संख्या आजही वाढती राहिली.. यजमान श्री.अभिजीत पाटील यांनी केलेली भाविकांची सेवा, व्यवस्थापन आणि चोख आयोजनामुळे एवढी संख्या असूनही भाविकांना कथेचा आनंद घेता येतो आहे..
परंपरेप्रमाणे सकाळी आरती व पूजनाने कथेची सुरुवात करण्यात आली. पंढरपूर येथील माजी व आजी नगरसेवकांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली. यावेळी शिवसेवा आणि जनसेवेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला..
भाविकांची सेवा करताना महाप्रसादाच्या स्वयंपाकापासून, वाढप व्यवस्था, मैदानाची सफाई, शिव स्वरूप धारण करण्याची जबाबदारी व भाविकांची आस्थेने विचारपूस या सर्वच कार्यात यजमान श्री.अभिजीत धनंजय पाटील यांचा अत्यंत उत्साहवर्धक आणि सक्रिय सहभाग सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरला..
दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत या कथेचे आयोजन केले असून पंढरपूर व पंचक्रोशीतील भाविकांनी या कथेचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा..